जुळ्या बहिणींसोबत संसार थाटलेल्या नवरदेवावर कारवाई नाही? काय आहे कायद्यातील पळवाट?

मुंबई तक

अकलूज : जुळ्या बहिणींशी लग्न करणारा नवरदेव संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच अडचणीत आला असल्याचं बोललं जातं आहे. नवरा मुलगा ‘अतुल उत्तम आवताडे’ विरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 494 नुसार NCR दाखल केला आहे. याबाबत माळेवाडी येथील राहुल भारत फुले यांनी तक्रार नोंदविली होती. हिंदू विवाह कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीचं दुसरं लग्न कायदेशीर ग्राह्य मानलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अकलूज : जुळ्या बहिणींशी लग्न करणारा नवरदेव संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच अडचणीत आला असल्याचं बोललं जातं आहे. नवरा मुलगा ‘अतुल उत्तम आवताडे’ विरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 494 नुसार NCR दाखल केला आहे. याबाबत माळेवाडी येथील राहुल भारत फुले यांनी तक्रार नोंदविली होती. हिंदू विवाह कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीचं दुसरं लग्न कायदेशीर ग्राह्य मानलं जातं नाही, ते रद्दबातलं किंवा अवैध ठरवलं जातं. म्हणजेचं दुसऱ्या पत्नीसोबत केलेला विवाह रद्दबातल ठरतो.

मात्र आता या प्रकरणात संबंधित नवरदेवावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं बोललं जातं आहे. त्याचं कारण म्हणजे कायद्यातील काही पळवाटा.

काय आहेत कायद्यातील पळवाटा?

कायदयाचे अभ्यासक ॲड. विनायक सरवळे यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं,

  • 494 कलमांतर्गत फक्त पती आणी पत्नीलाचं तक्रार करण्याचा अधिकार आहे. लग्न पूर्णपणे दोन व्यक्तीपुरता मर्यादित विषय असल्याने त्रयस्त व्यक्तीला यामध्ये तक्रार करण्याचा अधिकार कायद्याने दिला नाही.

  • त्यामुळेच राहुल भारत फुले यांनी नोंदविलेली तक्रार कायदेशीर दृष्ट्या वैध ठरतं नाही.

  • हे वाचलं का?

      follow whatsapp