“उद्धवजींनी सत्तेसाठी शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या दावणीला बांधला”, भाजपचं जोरदार प्रत्युत्तर
शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने गोठवलं. त्यानंतर भावनिक भाषण करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली. तसंच भाजपवरही त्यांनी निशाणा साधला. एवढंच नाही तर आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही पाच हजार वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंसारखा दानव झाला नाही अशीही टीका करण्यात आली आहे. या सगळ्याला आता भाजपने उत्तर दिलं आहे. भाजपचे […]
ADVERTISEMENT

शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने गोठवलं. त्यानंतर भावनिक भाषण करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली. तसंच भाजपवरही त्यांनी निशाणा साधला. एवढंच नाही तर आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही पाच हजार वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंसारखा दानव झाला नाही अशीही टीका करण्यात आली आहे. या सगळ्याला आता भाजपने उत्तर दिलं आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या सगळ्याबाबत फेसबुक पोस्ट लिहित उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या दावणीला बांधला अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
काय म्हटलं आहे केशव उपाध्ये यांनी?
#ही_तर_तुमच्या_कर्माची_फळे
स्मृतिस्थळाची ज्योत हलतेय, म्हणजेच बाळासाहेबांना त्रास होतोय”
– उद्धवसाहेब, गेल्या २१ जूनला किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर झाले होते. बाळासाहेबांचे अजूनही लक्ष आहे यावर किशोरीताईंचा विश्वास होता. तुमचाही नक्कीच असेल. म्हणूनच, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाची वाताहत झाल्याचे खापर इतरांवर फोडू नका. ही तुमच्याच कर्माची फळे आहेत. तुम्ही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या दावणीला बांधला. राष्ट्रवादीपुढे गुडघे टेकले. बाळासाहेबांना कधीच मान्य नसलेली सत्तेची पदं स्वतःकडे घेतलीत आणि हिंदुत्वाला लाज वाटणाऱ्या पालघर साधू हत्याकांडावर मौन पाळले.