Mucormycosis च्या रूग्णांना मोठा दिलासा, राज्य सरकारकडून उपचारांचे दर निश्चित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराच्या रूग्णांची संख्या वाढते आहे. ही बाब लक्षात घेऊन या आजारावरचे उपचार आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रूग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंजुरी दिली. दरनिश्चिती करताना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत असं राज्य सरकारने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत म्युकरमायकोसिसच्या रूग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. त्यानुसार महात्मा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी योजनेत सहभागी रूग्णालयातून म्युकरमायकोसिसच्या रूग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.

खासगी रूग्णालयातील म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रूग्णांची वाढती संख्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उपचाराबाबत खासगी रूग्णालयांमधील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला मान्यता दिली आहे. ही अधिसूचना आजपासून 31 जुलै 2021 पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे.

हे वाचलं का?

Black Fungus: अधिक वाफ घेणं ठरु शकतं धोकादायक, ब्लॅक फंगसला देतं निमंत्रण!

असे असणार आहेत म्युकरमायकोसिसवरच्या उपचारांचे दर

ADVERTISEMENT

वॉर्डमधील अलगीकरण : अ वर्ग शहरांसाठी 4 हजार रूपये, ब वर्ग शहरांसाठी 3 हजार रूपये आणि क वर्ग शहरांसाठी 2400 रूपये दर निश्चित करण्यात आला असून त्यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधं, बेड्सचा खर्च व जेवण यांचा समावेश आहे. मोठ्या चाचण्या व तापसणी तसेच उच्च पातळीवरची मोठी औषधं यातून वगळली आहेत.

ADVERTISEMENT

व्हेंटिलेटरशिवाय आयसीयू व विलगीकरण : अ वर्ग शहरांसाठी 7500 रूपये, ब वर्ग शहरांसाठी 5500 आणि क वर्ग शहरांसाठी 4500 रूपये

अ वर्ग शहरांमध्ये मुंबई तसेच महानगर क्षेत्र (मीरा भाईंदर मनपा, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर मनपा क्षेत्र, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर, पनवेल महापालिका) पुणे तसेच, पुणे महानगर क्षेत्र नागपूर, नागपूर मनपा, दिगडोह, वाडी यांचा समावेश आहे.

ब वर्ग शहरांमध्ये नाशिक, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांच्यासह जिल्हा मुख्यालयं यांचा समावेश आहे.

क वर्ग गटात अ आणि ब गटाव्यतिरिक्त इतर शहरांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

म्युकरमायकोसिस आजारात शस्त्रक्रिया या उपचारांतील महत्त्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने 28 प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला असून अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी 1 लाख रूपयांपासून ते 10 हजार रूपये, ब वर्ग शहरांसाठी 75 हजार रूपयांपासून 7500 रूपयांपर्यंत आणि क वर्ग शहरांसाठी 60 हजार रूपयांपासून ते 6 हजार रूपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT