एकनाथ शिंदेसह १६ जणांची आमदारकीच धोक्यात?; बंडखोरांना विधानसभा उपाध्यक्षांची नोटीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आव्हान देणाऱ्या बंडखोर आमदारांच्या गटाला झटका बसण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेनं बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर विधानसभा उपाध्यक्षांनी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर प्रक्रिया सुरू केली आहे असून, १६ आमदारांना नोटिसा बजावली आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेच्या मागणीनंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असून, बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. बैठकीस अनुपस्थित राहिल्यास सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा देण्यात आला होता.

हे वाचलं का?

याच मुद्द्यावरून शिवसेनेनं बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांविरोधात कारवाई सुरू केली. शिवसेनेनं यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यानंतर शिवसेनेनं दिलेलं पत्र स्वीकारल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी अशी कारवाई करता येते का याबद्दल कायदेशीर सल्ला मागवला होता.

ठाकरे सरकारने एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांची खरंच सुरक्षा काढली का?

ADVERTISEMENT

कायदेशीर सल्ला आल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांकडून लवकरच १६ नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. १६ आमदारांना यावर भूमिका मांडण्यास सांगितले असून, सोमवार, २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ दिली जाणार आहे.

ADVERTISEMENT

…तर जाणार आमदारकी?

तुमचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी अर्ज करण्यात आला असून, यावर लेखी म्हणणे मांडण्यास सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील कागदपत्रेही सादर करण्यास सांगण्यात आलं असून, दिलेल्या मुदतीत कागदपत्रांसह भूमिका न मांडल्यास काहीही म्हणणं नाही, असं समजून निर्णय घेण्यात येईल, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंना निर्णयाचे अधिकार

एकीकडे कायदेशीर मार्गांचा वापर करून बंडखोरांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होताना दिसत आहे. विधानसभा उपाध्यक्षांकडे आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केलीये. दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकारणीची बैठक सुरू आहे.

या बैठकीत सर्व अधिकार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असून, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरण्यावरून टीका केली आहे.

Sanjay Raut :”शिवसेना पक्ष हायजॅक करणं शक्य नाही, कुणी तसा प्रयत्नही करू शकत नाही”

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब असं नाव निश्चित केलं आहे. याला मान्यता देण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला जाणार आहे. मात्र, याला आता शिवसेनेकडून विरोध केला जाणार आहे. शिवसेना तसं पत्र निवडणूक आयोगाला देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कुणाची आमदारकी आहे धोक्यात?

१) संजय शिरसाट

२) अब्दुल सत्तार

३)भरत गोगावले

४) संदीप भामरे

५) महेश शिंदे

६) अनिल बाबर

७) बालाजी कल्याणकर

८) एकनाथ शिंदे

९) लता सोनावणे

१०) प्रकाश सुर्वे

११) यामिनी जाधव

१२) तानाजी सावंत

१३) रमेश बोरनारे

१४) चिमणराव पाटील

१५) संजय रायमूलकर

१६) बालाजी किणीकर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT