नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझईने केलं लग्न; ट्विटरवर शेअर केले फोटो

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाकिस्तानातील तालिबांनी नियमांना झुगारून देत मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारी आणि नोबेल शांती पुरस्कार विजेती मलाला युसुफझईने (Malala Yousafzai) लग्न केलं आहे. स्वतः मलालानेच काही फोटो ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. (Nobel laureate Malala Yousafzai got married in Birmingham)

ADVERTISEMENT

नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझईने पती आणि आईवडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत मलालाने कॅप्शनमध्ये लग्नाबद्दलची माहिती दिली.

‘आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अमूल्य दिवस आहे. असर आणि मी आयुष्यभरासाठी विवाहबद्ध झालो आहोत. आम्ही बर्मिंघममध्ये आमच्या कुटुंबियांसोबत एका छोटेखानी विवाह सोहळा आयोजित केला होता. आम्हाला आपल्या सदिच्छा द्या. पुढील आयुष्य सोबत जगण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत’, असं मलालाने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

24 वर्षीय मलाला मुळची पाकिस्तानी असून, मुलींच्या शिक्षणासाठी तिने काम केलं आहे. 15 वर्षांची असताना मलालावर दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यातून बचावल्यानंतर मलालाने पाकिस्तानातील तालिबानी नियमां विरोध करत मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला होता. मलाला युसुफझई नोबेल पुरस्कार मिळालेली इतिहासातील वयाने सर्वात लहान व्यक्ती आहे.

ADVERTISEMENT

कोणत्या संघटनेनं केला होता हल्ला?

ADVERTISEMENT

पाकिस्तानातील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेनं ऑक्टोबर 2012 मध्ये मलालावर हल्ला केला होता. या हल्ल्याची जबाबदारी या संघटनेनं नंतर स्वीकारली होती. त्या वेळी १५ वर्षांची मलाला बसमधून स्वात खोऱ्यातील तिच्या शाळेत जात असताना दहशतवाद्यांनी तिच्या डोक्यात गोळ्या घातल्या होत्या, परंतु त्यातून ती बचावली होती. मलालावर आधी पाकिस्तानात व नंतर ब्रिटनमध्ये उपचार करण्यात आल्यानंतर ती बचावली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT