भावजीकडून अल्पवयीन मेव्हणीवर अत्याचार, सततच्या बलात्कारानंतर पीडिता गरोदर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर केलाच शिवाय या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून त्या अल्पवयीन मुलीला तो वारंवार ब्लॅकमेल करत असल्याचंही समोर आलं आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी ही आरोपीची अल्पवयीन मेहुणी आहे.

ADVERTISEMENT

19 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी नोएडाच्या सेक्टर 39 मध्ये बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

सेक्टर 39 मध्ये राहणाऱ्या मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, आरोपीने मुलीला काही आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि तिचा अश्लील व्हिडिओ शूट केला. यानंतर याच व्हीडिओची भीती दाखवून तो मुलीला सतत ब्लॅकमेल करत होता.

हे वाचलं का?

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी टेक्निकल सर्विसच्या मदतीने आरोपी जितेंद्रसिंग प्रजापती याला अटक केली. जितेंद्र सिंग प्रजापती हा भरतपूर राजस्थानचा रहिवासी असून तो सध्या नोएडा सेक्टर 44 मध्ये राहत होता.

नोएडा येथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी या आरोपीला सेक्टर 37 चौकाजवळून अटक केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आरोपी एप्रिल 2021 पासून त्याच्या सख्ख्या मेव्हणीला धमकावून तिच्यावर सतत बलात्कार करत होता. एवढंच नव्हे तर या सगळ्या प्रकाराने आरोपीची मेहुणी ही गरोदर देखील राहिली होती. ज्यानंतर आरोपीने तिचा गर्भपातही करून घेतला होता.

ADVERTISEMENT

वाईमध्ये मामानेच केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार, पीडित मुलगी गरोदर राहिल्याने समोर आली घटना

ADVERTISEMENT

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या मोबाइलमधून बलात्काराच्या वेळी शूट केलेले अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे आता जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. तर अल्पवयीन पीडित मुलीला जो मानसिक धक्का बसला आहे त्यातून बाहेर येण्यासाठी तिचे समुपदेशन करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT