ठाण्यात बोगस कागदपत्रांद्वारे MMRDA च्या सदनिका वाटप आदेश वितरित करणाऱ्याला भामट्याला अटक
विक्रांत चौहान, प्रतिनिधी, ठाणे ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी एमएमआरडीएचे बनवत सदनिका वाटप आदेश वितरीत करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं. या छापेमारी दरम्यान पोलिसांनी आरोपीं कडून सदनिका प्राधिकरणाचे बनावट कागदपत्रे, शिक्के सगळे बनावट कागदपत्रे असा एकूण 10 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या […]
ADVERTISEMENT
विक्रांत चौहान, प्रतिनिधी, ठाणे
ADVERTISEMENT
ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी एमएमआरडीएचे बनवत सदनिका वाटप आदेश वितरीत करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं. या छापेमारी दरम्यान पोलिसांनी आरोपीं कडून सदनिका प्राधिकरणाचे बनावट कागदपत्रे, शिक्के सगळे बनावट कागदपत्रे असा एकूण 10 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करून आणखी या प्रकरणात कोणी सहभागी आहे का याचा तपास आता मुंब्रा पोलीस करत आहेत.
ठाणे : पॅरिसमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल असल्याचं सांगून 26 महिलांची फसवणूक; अनेकींवर बलात्कार
हे वाचलं का?
काय आहे प्रकरण?
ठाण्यातील मुंब्रा परिसरातील खडी मशिन रोड, आझाद नगर या ठिकाणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंर्तगत रस्त्याच्या रुंदीकरणातील बाधितांना बनावट सदनिका वाटप आदेश वितरित केली जात असल्याची माहिती 30 डिसेंबरला मुंब्रा पोलीस ठाण्याच्या महिला सह पोलीस निरीक्षक कृपाली बोरसे यांना मिळाली. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला.
ADVERTISEMENT
या छापेमारी दरम्यान 31 डिसेंबर रोजी पोलिसांनी इमरान मेहबुब जुनेजा उर्फ मुन्ना मर्चंट या 39 वर्षीय इसमाला ताब्यात घेतले. छापेमारीत मुंब्रा पोलिसांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सदनिका वाटप आदेश असे लिहिलेले एकूण 99 बुकलेट, विविध विभागाचे 21 शासकीय स्टॅम्प, घरांच्या 14 चाव्या, 18 गिऱ्हाईकांच्या सदनिकांची कागदपत्रे, 24 एमएमआरडीएचे लहान स्टीकरचे शीट, पाच स्टॅम्पपॅड, एक डायरी, एक प्रिंटर, तुळजाभवानी को. ऑप. हा. सोसायटी लेटरहेडवरील नऊ कागदपत्रे, एमएमआरडीएचे अॅलोटेड फ्लॅटचे लॅमिनेशन केलेले सर्टीफिकेट, 18 टोरंट पॉवरचे इंजिनियर नाव असलेले पिंक कलरचे फॉर्म तसेच इतर कागदपत्रे व साहित्य असा एकूण 10 हजार 320 रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.
ADVERTISEMENT
कौतुकास्पद! 16 किमी पायी जात ठाणे जिल्हा परिषद आरोग्य पथकाने केलं दापूरमाळ गावाचं लसीकरण
त्यानंतर 31 डिसेंबर रोजी पोलिसांनी इमरान मेहबुब जुनेजा उर्फ मुन्ना मर्चंट याच्या विरोधात शासन आणि नागरिकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी इमरानच्या विरोधात भादवि कलम 420,465, 466, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी इमरानला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 7 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत असून या प्रकरणात शासकीय किंवा खाजगी क्षेत्रातील काम करणारे आणखी कोणी आढळले तर त्याच्या विरोधात देखील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT