Maratha Reservation : संभाजीराजेंकडून उपोषण मागे, सरकारकडून मागण्या मान्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेल्या राज्यसभा खासदार संभाजीराजे यांची मनधरणी करण्यात राज्य सरकारला यश आलं आहे. संभाजीराजेंनी उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी संभाजीराजेंनी उपोषणस्थळी भेटही घेतली होती. यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संभाजीराजेंच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या आहेत. […]
ADVERTISEMENT

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेल्या राज्यसभा खासदार संभाजीराजे यांची मनधरणी करण्यात राज्य सरकारला यश आलं आहे. संभाजीराजेंनी उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी संभाजीराजेंनी उपोषणस्थळी भेटही घेतली होती.
यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संभाजीराजेंच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या आहेत. यानंतर संभाजीराजेंनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी संभाजीराजेंची भेट घेतली. “मराठा समाजाच्या शिष्ठमंडळाशी आमची चर्चा झाली. प्रत्येक मुद्द्यावर आम्ही चर्चा केली. आता मागे काहीही बाकी ठेवायचं नाही असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने जे काही करु शकतो, ते आपण करु.” राज्य सरकार आपल्या भुमिकेशी सहमत आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना दिल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
संभाजीराजेंनी केलेल्या मागण्या राज्य सरकारने केल्या मान्य –