लाइव्ह
Chhagan Bhujbal : ‘ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही’, OBC मेळाव्यात भुजबळ काय म्हणाले?
Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीमध्ये झालेल्या शिबिरामध्ये शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू रामचंद्र यांच्याबद्दलच्या वक्तव्याबद्दल अजूनही ठिकठिकाणी निषेध, आंदोलने सुरुच आहेत. तर आता काही ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे आव्हाडांच्या वक्तव्यामुळे राजकारण आणखी तापणार असल्याचे दिसत आहे.
ADVERTISEMENT
Chhagan Bhujbal
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 06:53 PM • 06 Jan 2024
Chhagan Bhujbal : ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, OBC मेळाव्यात भुजबळ काय म्हणाले?
ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. मराठ्यांना आरक्षण हवं तर स्वतंत्र घ्याव, असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. त्यांना जे आरक्षण देताय, ते वेगळ द्या. मराठा समाजाला विरोध नाही. पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही सुरु आहे. त्याला मात्र आमचा विरोध आहे, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. - 04:48 PM • 06 Jan 2024
Marathi News Live Update : महायुतीच्या माध्यमातूनच लोकसभेची निवडणूक लढविणार- अजित पवार
आगामी काळातील लोकसभेच्या जागांविषयी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादीचा गट आणि शिंदे गटाचे शिवसेनेचे वरिष्ठ नेत एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. त्यानंतर लोकसभेला सामोरे जाणार आहोत. ही निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लोकांसमोर जाणार आहे. तसेच मावळच्या जागेबाबत अजून कोणताही निर्णय झाला नसून आम्ही महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. - 03:45 PM • 06 Jan 2024
Marathi News Live Update : मंत्री सत्तार-खासदार हेमंत पाटलांमध्ये वाद- एकमेकांना दिल्या अश्लील भाषेत शिवीगाळ
हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीमध्ये निधी वितरित करण्याच्या कारणावरून आणि टक्केवारीच्या कारणावरून हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यामध्ये चांगली जुंपली होती. या बैठकीमध्ये दोन्हीही लोकप्रतिनिधींनी एकमेकांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. - 03:05 PM • 06 Jan 2024
Marathi News Live Update : शरद मोहोळ हत्या प्रकरणात दोन वकिलांचा सहभाग, दोघांनाही अटक
शरद मोहोळ हत्या प्रकरणी दोन वकिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात वकील आरोपींच्या कारमध्ये काय करत होते असा सवाल पोलिसांनी केला आहे. त्यामुळे वकिलांचा सहभाग या हत्येत आहे का त्याचाही तपास पोलीस करत आहे. हे दोन्हीही वकील न्यायालयात काम करत असून आरोपींसोबत ते काय होते असा सवाल त्यांनी केला आहे. तपासानंतर आता सर्व बाजू समोल येईल असंही पोलिसांनी सांगितले. - 02:04 PM • 06 Jan 2024
Marathi News Live Update : बारामती अॅग्रो कारखाण्याचा विषय भाजप मोठा असल्याचं दाखवताय- रोहित पवार
बारामती अॅग्रो कारखाण्यावर इडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. बारामती अॅग्रो कारखाण्याचा विषय भाजप मोठा असल्याचं दाखवतंय असं ते म्हणाले. भाजपमध्ये गेलेल्यांवर झालेल्या कारवाईचे नंतर काय झाले असा सवालही त्यांनी विचारला आहे. - 02:03 PM • 06 Jan 2024
Marathi News Live Update : जितेंद्र आव्हाड मोठे आणि अभ्यासू नेते- रोहित पवार
जितेंद्र आव्हाड यांच्या श्री रामाच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. जितेंद्र आव्हाड मोठे आणि अभ्यासू नेते आहेत. धर्मावर कुणी राजकीय टिप्पणी करू नये असं मतही त्यांनी मांडले - 01:05 PM • 06 Jan 2024
Marathi News Live Update : आताची सहकार चळवळ ही सहारा चळवळ-राज ठाकरे
आताचं सरकार आहे ती सहकार चळवळ नाही ती सहारा चळवळ आहे. की आम्हाला सांभाळा. या सरकारच्या या चळवळीतून आम्हाला सांभाळा अशी चळवळ यांनी सुरु केल्याची टीका त्यांनी सरकारवर केली. यावेळी त्यांनी महानंद डेअरीबद्दल बोलत महानंद डेअरी आता अमूल गिळंकृत करणार का काय अशी भीती वाटते अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. - 12:09 PM • 06 Jan 2024
Marathi News Live Update : ...तर आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रार्थना महाआरती करू- उद्धव ठाकरे
बाळासाहेब ठाकरे यांची जयंती 23 तारखेला असली तरी त्याआधीच 22 जानेवारीला राम मंदिरात अभिषेक होत आहे. प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण कोणाला मिळाले किंवा मिळाले नाही मात्र त्याबाबत आम्हाला काहीच बोलायचे नाही. मात्र त्यादिवशी नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक घेणार आहे. या बैठकीबरोबरच गोदावरीच्या काठावर महाआरतीही करणार आहे. राम मंदिरात अभिषेक होत असताना आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती करणार असल्याचेही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. - 11:22 AM • 06 Jan 2024
Marathi News Live Update : मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्याला ठाण्यातून अटक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाला ठाण्यातून अटक केली आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील भदोही जनपद येथील असून टिकैतपूरमधील रहिवासी आहे. फतेहपूर गावातील सामूहिक हत्याकांड प्रकरणी आरोपी प्रेमचंदच्या कारवाई प्रकरणी त्याने थेट मुख्यमंत्री योगींना सोशल मीडियावरून धमकी दिली होती. - 10:47 AM • 06 Jan 2024
Marathi News Live Update : ओबीसीमधून मराठा आरक्षण देणं अशक्य- मंत्री छगन भुजबळ
वादविवाद करणारे आणि वाढवणाऱ्यांना सुबुद्धी द्यावी असं मागणं पांडुरंगाला मागणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून आमदारांची घरे पेटली, टार्गेट केलं तेव्हा वाटलं आता बोलले पाहिजे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले आहे. यावेळई त्यांनी सांगितले की, मी ओबीसी कार्यकर्ता आधी आहे नंतर मंत्री आहे. मराठा आरक्षण ओबीसीमधून देणे अशक्य असून त्यासाठी सर्वप्रकारची लढाई आम्ही लढू मग ती न्यायालयीन असो किंवा रस्त्यावरची असो ती दोन्ही लढाई लढणार असल्याचा इशारा भुजबळांनी दिला आहे. - 10:11 AM • 06 Jan 2024
Marathi News Live Update : ईडीच्या भीतीने पक्ष फोडून चोरण्याला भूकंप म्हणत नाहीत-संजय राऊत
निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. त्यावर पलटवार करताना खासदार संजय राऊत यांनी हा महाराष्ट्र आहे. रोज भूकंप व्हायला हे जपान नसल्याची टीका केली आहे. संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत ईडीच्या भीतीने पक्ष चोरण्याला भूकंप म्हणत नसल्याचा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी 2024 मध्येही ज्यावेळी राजकीय भूकंप होईल त्यावेळी तुम्ही कुठे वाहून जाणार त्याचीही तुम्ही मनाची तयारी केली पाहिजे असा इशाराही राऊतांनी दिला आहे. - 09:19 AM • 06 Jan 2024
Marathi News Live Update : आमदार सुनील कांबळेंवर गुन्हा दाखल, पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरण भोवले
पुण्याच्या ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपचे आमदार सुनील कांबळे तिथे उपस्थित होते. त्यावेळी मानापमानाच्या नाट्यवरून त्यांनी नेत्यांबरोबर वाद घालत असतानाच त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - 08:56 AM • 06 Jan 2024
Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार
शिवसंकल्प अभियानाची आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. लोकसभेच्या 'मिशन-48'साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसंकल्प अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून या अभियानाला आजपासून सुरुवात होणार असून एकनाथ शिंदे यांच्यासह पुण्यातील अनेक राजकीय नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. - 08:28 AM • 06 Jan 2024
Marathi News Live Update : शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आज उद्घाटन
यावर्षी 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज शुभारंभ होत आहे. या शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचे अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुण्यात नाट्य आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या नाट्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या नाट्य समंलेनाला शरद पवार आणि अजित पवार यांचीही उपस्थिती असण्याची शक्यता आहे. - 08:16 AM • 06 Jan 2024
Marathi News Live Update :आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात शिर्डीमध्ये गुन्हा दाखल-विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आक्रमक
शिर्डीमध्ये अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद आव्हाड यांच्या विरुद्ध विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 3 जानेवारी रोजी शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवासात असताना मांसाहार करायचे असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे त्वरित पडसाद उमटले आहेत. त्याच रात्री उशिरा विहिंप , बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT