पंकजाताई माझी औकात काढत आहात? 2019 चा पराभव विसरलात का?-धनंजय मुंडे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मला 32 नंबरच्या खात्याचे मंत्री म्हणत आहात, पंकजाताई 2019 चा पराभव विसरलात का? तुम्ही चार विभागाच्या मंत्री होतात, त्यावेळी परळीच्या जनतेने तुम्हाला औकात दाखवून दिली असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

32 नंबरच्या खात्याचे मंत्री म्हणत पंकजा मुंडेंनी केलेली टीका धनंजय मुंडे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. केज नगरपंचायतच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी करत पंकजा मुंडेना प्रतिउत्तर दिलंय. बीडमध्ये मुंडे बहीण भावात आरोप प्रत्यारोपाच्या फैरीवरून चांगलीच जुंपलीय. नगरपंचायतच्या निवडणूक आखाड्यात पंकजा आणि धनंजय यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून यातच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जुगलबंदी सुरू झाली.

हे वाचलं का?

वडवणी नगरपंचायतच्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली होती. निवडणुकीच्या तोंडावर 100 कोटीची घोषणा करतात, दोन वर्ष काय टाळ कुटत होते का ? असा सवाल करत उपरोधिक टोला लगावला होता.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

ADVERTISEMENT

‘पालकमंत्री बीड जिल्ह्यातील निवडणूक प्रचारात नगरपंचायतीला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतात. जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींना पाचशे कोटी देणार आहेत, तर मग दोन वर्षे काय टाळ कुटत बसला होता काय? जिल्ह्याचे भले करण्याची भूमिका पालकाची असली पाहिजे. कुणाला तुरुंगामध्ये टाकायचे. कुणाचे घर बर्बाद करायचे, असले राजकारण आम्हाला गोपीनाथ मुंडे यांनी शिकवलं नाही”, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी निशाणा साधला. आमचं सरकार होतं, तेव्हा मी पहिल्या चार मंत्र्यांत होते. मी काही 32व्या क्रमांकाची मंत्री नव्हते. यांचे भविष्य फार चांगले नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि यांचा कबाडा होणार आहे. असं पंकजा मुंडे म्हणाल्या. याच टीकेला आत्ता धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

धनंजय मुंडेंनी काय दिलं उत्तर?

भाजपचं कमळ बीडमधून गायब झालंय. केज नगरपंचायतमध्ये साधा एकही उमेदवार भाजपला मिळत नाही. एवढी वाईट वेळ भाजपवर आली आहे. साधा एक उमेदवार उभा करता आला नाही तुम्हाला अन तुम्ही माझी औकात काढता.. ताई औकात काढताना दोन वर्षा पूर्वीचा निकाल तर लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या वर टीका करा. कारण तुम्ही माझ्या ताई आहेत. यापूर्वी देखील 10 वेळा मी कधी तुम्ही टीका केली असेल. पण आज तुम्ही सामाजिक न्याय आणि विशेष विभागाची औकात काढली. ताई आज सामाजिक न्याय विभागाची औकात काढून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. अस देखील धनंजय मुंडे म्हणाले

2019 ला निवडणूक लढवत होता त्या वेळी महिला बालकल्याण, जलसंधारण ,ग्रामविकास या खात्याचे नंबर मला माहित नाहीत. मात्र हे सगळं असताना परळीच्या जनतेने तुम्हाला औकात दाखवून दिली, हे विसरलात का? बीड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यापुढं संकटं असताना ताई आपण कुठे होतात ? बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचे 502 कोटी अनुदान मिळवून दिले. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशे जमा झाले..25%अग्रीम विमा दिला ही आमची औकात सामाजिक न्याय विभागाला कमी समजू नका..राज्यातील 35%लोकांच्या संपर्कात आहे..या विभागात काय नाही, विधवा परित्यक्ता, किन्नर, अंध अपंग, दलित वंचित आहेत. याच विभागात किती जणांचा अपमान केला.. 32 व्या नंबर चे खाते 1 नंबर ला नेऊ शकतो, हा विश्वास पवार साहेबांना आहे. त्यामुळं त्यांनी हे खातं मला दिलं असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT