आणखी एक धक्का! महाराष्ट्रात सत्तानाट्याचं महाभारत सुरू असतानाच मंत्री उदय सामंत गुवाहाटीला रवाना
महाराष्ट्रात सत्तानाट्याचं महाभारत सुरू झालं आहे, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन करत शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. या सगळ्या धामधुमीत उच्च, तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीला रवाना झाले आहेत. आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेतले नेते हे पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच पक्षातले […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात सत्तानाट्याचं महाभारत सुरू झालं आहे, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन करत शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. या सगळ्या धामधुमीत उच्च, तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीला रवाना झाले आहेत. आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेतले नेते हे पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच पक्षातले नेते त्यांची साथ सोडत आहेत.
ADVERTISEMENT
उदय सामंत हे कोकणातले सेनेचे प्रमुख नेते मानले जातात, ते गुवाहाटीला गेले आहेत त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. ज्या चार्टड विमानाने ते गेले आहेत, त्या विमानाच्या यादीत उदय सामंत हे नाव पहिलं आहे. चार्टड विमानाच्या या लिस्टमध्ये हे नाव पहिलं आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे हे भावनिक आवाहन करत आहेत. आदित्य ठाकरेंनीही काल आणि त्याआधीही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची भेट आणि मेळावे घेतले आहेत. एकीकडे काही शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत तर दुसरीकडे एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना उदय सामंत यांनी गुवाहाटीला जाणं पसंत केलं आहे. शिवसेनेतली फाटाफूट थांबवणं आता उद्धव ठाकरेंच्या हातात राहिलेलं नाही अशाही चर्चांना उधाण आलं आहे.
हे वाचलं का?
शिवसेनेत उद्धव ठाकरेंनी ठरवलेलं दिसतं आहे की आपल्यासोबत मंत्री राहणार नाहीत. त्यामुळे ते पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना आक्रमक होऊनही त्यांच्या मंत्र्यांना ते थांबवू शकलेले नाहीत हे वास्तव आहे. आता या सगळ्या सत्तानाट्यात नेमकं काय काय घडणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच शिवसेनेला फुटण्यापासून वाचवण्याचं सर्वात मोठं आव्हान हे उद्धव ठाकरेंसमोर आहे.
राज्यात राजकीय घडामोडी सुरू असताना मंत्री उदय सामंत शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहत होते. शुक्रवारी (ता. २४) पाली येथील निवासस्थानी मंत्री उदय सामंत यांनी दिवसभर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली. कुटुंबीयांशीही चर्चा केली. या चर्चेतील प्रतिसादाचा अंदाज घेऊन सामंत लवकरच भावी राजकीय दिशा ठरवतील, असा अंदाज मांडला जात होता.
ADVERTISEMENT
विवारी दुपारी सोशल मीडियावर सामंत गुवाहटीला रवाना झाल्याचे समजले आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला. यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यात चर्चांना उधाण आले. एका व्हॉटअप ग्रुपवर ते सुरत मार्गे रवाना झाल्याचीही चर्चा रंगली होती.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान देत सर्वात मोठं बंड उभं केलं आहे. अशा सगळ्या वातावरणात आता एकीकडे पक्ष फुटीपासून वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करत असताना या सरकारमधले आणखी एक मंत्री उदय सामंत हे गुवाहाटीत गेले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT