Monkeypox Virus ची दहशत, केंद्राकडून अलर्ट! महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

मुंबई तक

जगभरात कोरोनाने जो काही हाहाकार दीड ते दोन वर्षे माजवला तो सगळ्यांनीच पाहिला आहे. ती दहशत संपत नाही तोच आता मंकीपॉक्स (Monkeypox) या नव्या रोगाने दहशत वाढवली आहे. मंकीपॉक्सच्या रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स (Monkeypox) रूग्ण आढळले आहेत. WHO अर्थात जागतिक आरोग्य संस्थेने सांगितल्यानुसार मंकीपॉक्स हा विषाणूजन्य जुनोटिक रोग आहे. याचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जगभरात कोरोनाने जो काही हाहाकार दीड ते दोन वर्षे माजवला तो सगळ्यांनीच पाहिला आहे. ती दहशत संपत नाही तोच आता मंकीपॉक्स (Monkeypox) या नव्या रोगाने दहशत वाढवली आहे. मंकीपॉक्सच्या रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स (Monkeypox) रूग्ण आढळले आहेत.

WHO अर्थात जागतिक आरोग्य संस्थेने सांगितल्यानुसार मंकीपॉक्स हा विषाणूजन्य जुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतात. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रूग्ण आढळलेला नाही. मात्र इतर देशांमध्ये या रोगाची प्रकरणं वाढत आहेत. त्यामुळे मोदी सरकारने भारतातील सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राने दिलेल्या सूचनेनंतर आता महाराष्ट्र सरकारनेही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

महाराष्ट्र सरकारची मंकीपॉक्स संदर्भात काय आहे अॅडव्हायजरी?

मागच्या २१ दिवसात मंकीपॉक्स प्रभावित देशांमधे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवलं जातं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp