नवनीत आणि रवी राणांवर मुंबई पोलिसांनी ‘याच’ कारणामुळे दाखल केला राजद्रोहाचा गुन्हा
अपक्ष आमदार रवी राणा आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसा म्हणणारच असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर ते कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईत दाखल झाले. हे दोघेही मुंबईत आले तेव्हा शिवसेना विरूद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पाहण्यास मिळाला. त्यानंतर या दोघांनीही हनुमान चालीसा म्हणणार नाही असंही सांगितलं. मात्र या दोघांना अटक करण्यात […]
ADVERTISEMENT

अपक्ष आमदार रवी राणा आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसा म्हणणारच असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर ते कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईत दाखल झाले. हे दोघेही मुंबईत आले तेव्हा शिवसेना विरूद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पाहण्यास मिळाला. त्यानंतर या दोघांनीही हनुमान चालीसा म्हणणार नाही असंही सांगितलं. मात्र या दोघांना अटक करण्यात आली. राजद्रोहाचं कलम या दोघांवर लावण्यात आलं आहे. ते का? याचं कारणच मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे.
नवनीत आणि रवी राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा, काय असतो राजद्रोह?
नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनी जामीन मिळावा म्हणून जो अर्ज करण्यात आला आहे त्या अर्जावर आज सुनावणी होऊ शकली नाही. पण महाराष्ट्र सरकारमार्फत एक प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल करण्यात आलं आहे. राजद्रोहाचा गुन्हा आणि या दाम्पत्याला जामीन का मिळू नये? यासंदर्भातली भूमिका कोर्टासमोर ठेवण्यात आली आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजता मुंबईतल्या सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी घेतली जाणार आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यातर्फे उद्या महेश जेठमलानी हे बाजू मांडतील. महेश जेठमलानी हे भाजपचे खासदारही आहेत. तसंच एक निष्णात वकील म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. मात्र राजद्रोहाचा गुन्हा का दाखल करण्यात आला आहे? याचं उत्तर आपण जाणून घेऊ.