Sushant Singh: सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीसच खरे ठरले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Actor Sushant Sing Rajput) याच्या मृत्यू प्रकरणाला (Death Case) आज (14 जून 2021) वर्ष पूर्ण झालं आहे. पण अद्यापही काही याबाबतीत काही गोष्टी अनुत्तरीतच आहेत. खरं तर सुशांत सिंह मृत्यूप्रकरणामुळे महाराष्ट्रच (Maharashtra) नव्हे तर देशाचं देखील राजकारण ढवळून निघालं होतं.

ADVERTISEMENT

यावेळी काही जणांनी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) तपासावर देखील संशय व्यक्त केला होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आलं. पण आता या घटनेला वर्ष पूर्ण झालेलं असताना देखील सुशांत सिंह प्रकरणात सीबीआयकडून कोणताही ठोस अहवाल देण्यात आलेला नाही. त्यामुळे सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस खरे ठरले असल्याची चर्चा आता रंगली आहे.

सुरुवातीला सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे देण्यात आला होता. प्रथमदर्शनी ती आत्महत्या असल्याचं सांगण्यात येत होतं. जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा त्यावेळी घरात काही जण उपस्थित असल्याचं समोर आलं होतं. सुशांत सिंहचा मित्र सिद्धार्थ पिठानी, त्याच्या घरी काम करणारे दिपेश सावंत, निरज सिंग आणि कुक केशव बाचने हे सगळे हजर होते. सुरूवातीला या चौघांवर संशयाची सुई होती.

हे वाचलं का?

ड्रग्ज प्रकरणात NCBकडून 40 हजार पानी चार्जशीट, रियासह 33 नावं

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही गळफास लावून मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

मुंबई पोलीस या तपासादरम्यान सुशांतच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची सुरूवातीपासूनच कसून चौकशी करत होते. त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, त्याचे कुटुंबीय, त्याच्या घरचे कामगार, इंडस्ट्रीमधल्या अशा व्यक्ती ज्यांच्याबरोबर त्याने काम केलं. प्रत्येकाचा जबाब नोंदवला गेला.

ADVERTISEMENT

सुशांतला नेपोटिझमुळे संधी नाकारण्यात आली, त्यामुळे आत्महत्या केल्याच्या थिअरीज या काळात मांडल्या गेल्या. फिल्ममेकर संजय लिला भन्साळी, शेखर कपूर यांच्या वक्तव्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची स्थिती निर्माण झाली.

त्यानंतर जवळजवळ महिनाभराने सुशांतची गर्लफेन्ड म्हणजे रिया चक्रवर्ती हिने ट्विटरवरुन गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी केली की, याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणात पहिल्यांदा सीबीआयची एन्ट्री झाली. यानंतर रियाला बलात्कार, हत्येच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. ज्याबाबत तिने तक्रार देखील नोंदवली होती.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर असलेल्या सिनेमाचा टिझर रिलीज

साधारण 2020 जुलैच्या शेवटच्या आठवड्यात निर्माता आदित्य चोप्रा, महेश भट, करण जोहर आणि संजय लिला भन्साळी यांना चौकशीसाठी समन्स बजावला गेला.

नंतरच्या काळात सुशांतची सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सॅलिअनच्या मृत्यूशी आणि सुशांतच्या मृत्यूशी काही टॉप बॉलिवूड सेलिब्रिटिज आणि मुंबईतल्या राजकीय नेत्यांशी संबंध असल्याच्याही चर्चा झाल्या. पण त्यातबाबत फार काही समोर आलं नाही.

28 जुलै 2020 ला सुशांतचे वडील केके सिंग यांनी पटना पोलिसांकडे एफआयआर दाखल केल्याने पटना पोलिसांचं एक पथक मुंबईत दाखल झालं. पण त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं.

मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करत नाही. त्याच्या मृत्यूला 1 महिना होऊन गेला तरी ठोस कारण पुढे आलं नाही. अशी ओरड व्हायला लागली. सोशल मीडियावरही याबाबतच्या नाराजीच्या पोस्ट व्हायरल होत होत्या.

सुशांतला फिल्ममेकर रुमी जाफ्री यांच्याकडून अगामी चित्रपटासाठी 15 कोटी मिळणार होते. हे पैसे रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी स्वत:कडे ठेवल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला.

नंतर हे पैसे फिल्ममेकर कडूनच दिले गेले नव्हते असं समोर आलं. पण एव्हाना प्रकरण इतकं चिघळलं होतं की, ते सर्वाच्च न्यायालयात पोहोचलं आणि सर्वाच्च न्यायालयाने ही केस सीबीआयकडे वर्ग केली.

मुंबई पोलीस योग्य तपास करत नाही या चर्चांना या निर्णयामुळे बळच मिळालं. सीबीआयने या चौकशीला सुरूवात केली, त्यांच्याबरोबर ईडी आणि एनसीबी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचीही एन्ट्री झालेली होती.

मग रिया चक्रवर्ती आणि तिचा भावाचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं. रियाच्या घराचा तपास झाला त्यानंतर ड्रग्ज आढळल्याने साम्युअल मिरॅन्डा, शोविक चक्रवर्ती यांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

सुशांत प्रकरणात माझ्यावर आरोप करू नका- अंकिता लोखंडे

रियालाही दोनदा समन्स बजावण्यात आलं आणि नंतर तिलाही अटक करण्यात आली. त्यानंतर एक-एक करून सारा अली खान, रकूल प्रित, श्रद्धा कपूर सुशांतची एक्स बिझनेस मॅनेजर जया सहा या सुशांत संपर्कात आलेल्या सगळ्यांना ड्रग्स प्रकरणी चौकशीसाठी बोलवलं गेलं. नंतर दीपिका पादुकोणचीही चौकशी झाली.

तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशचीही चौकशी झाली. तब्बल 40 जणांना ड्रग्स केसप्रकरणी अटक झाली. सगळ्यात शेवटची अटक झाली ती सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला. सुशांतच्या या मित्राला हैद्राबादमधून अटक करण्यात आली.

यातून काय सिद्ध होत होतं तर सुशांत ड्रग्स घ्यायचा. म्हणजे तो डिप्रेशनमध्ये होता. त्याची गर्लफ्रेंड रियाने असा दावा केला की, सुशांत बायपोलार होता. त्याच्या मानसिक स्थितीबद्दल त्याच्या कुटुबीयांना कल्पना होती.

तो डिप्रेशनवर उपचार करणारी औषधं घेत होता. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी मान्य केलं नाही. त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही हे खोटं असल्याचं म्हटलं होतं.

आता वर्षभराने या प्रकरणाकडे पाहायचं झालं तर सप्टेंबर 2020 नंतर एकही जबाब नोंदवला गेलेला नाही. नार्कोटिक्स ब्युरोकडून अजुनही ड्रग्जच्या अंग्लने प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण सुशांतला ड्रग्स पुरवण्यात रियाचा हात असल्याचं अजूनही सिद्ध झालेलं नाही.

अनेक सेलिब्रिटीजची चौकशी झाली पण त्यातूनही सुशांतच्या मृत्यूबद्दलची ठोस अशी माहिती समोर आलीच नाही.

सुशांत सिंग राजपूतच्या मॅनेजरला एनसीबीकडून अटक

सीबीआयच्या चौकशीचा अंतिम अहवाल अजूनही प्रतिक्षेतच आहे. सीबीआयने त्यांचा अहवाल अद्यापही जाहीर केलेला नाही. कोणालाच अजून या प्रकरणी अटक झालेली नाही. आणि एम्सचं पथक आता सुशांत मृत्यू गळफास लागल्याने झाल्याच्या निर्णयावर येऊन पोहोचलं आहे. जो निर्णय मुंबई पोलिसांनी त्यांच्याकडून केस काढून देण्याअगोदरच दिला होता.

अर्थात ही आत्तापर्यंत घडलेल्या घडामोडींवरून दिसणारी स्थिती आहे. पण सुशांतच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि अजून तरी त्याची हत्या की आत्महत्या? या प्रश्नाचं उत्तर सीबीआयला देता आलेलं नाही. त्यामुळे सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीसच खरे ठरले असल्याची चर्चा रंगलेली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT