‘नंतर मुंबईत खड्डे शोधावे लागतील’, एकनाथ शिंदेंनी सांगितली ‘खड्डेमुक्त मुंबई’ची डेडलाईन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंडिया टुडे कॉनक्लेव्हच्या मंचावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याची डेडलाईन सांगितली. मुलाखतीत एकनाथ शिंदेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. मुंबईतील विकासकामांबद्दल बोलताना शिंदेंनी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.

ADVERTISEMENT

मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांचा मुद्दा मुलाखतीदरम्यान उपस्थित करण्यात आला. आजही मुंबईत थोडाफार पाऊस होतो, तेव्हा गाड्या नीट चालू शकत नाही. मुंबई आजही ट्रॅफिकची समस्या आहे. मेट्रोचा प्रोजेक्ट निर्धारित वेळ निघून गेली, तरीही सुरूच आहे. वेळेत पूर्ण होत नाहीये. कारण मुंबईतील रस्ते जोपर्यंत सुधारणार नाही, तोपर्यंत पुढील काम कसं होईल? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला.

Eknath Shinde : मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आयुक्तांना सूचना

मुंबईतल्या रस्त्यांबद्दल आणि प्रोजेक्टबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आमचं सरकार आल्यानंतर मी महापालिका आयुक्त चहल यांना बोलावलं. त्यांना विचारलं की, खड्ड्यांचं माध्यमात का दाखवलं जातंय? लोकांना त्रास होतोय. काय कारण आहे? ते म्हणाले, ‘आम्ही दरवर्षी ५० किमी रस्त्यांचं सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय.”

हे वाचलं का?

India Today Conclave Mumbai : ते कबूल कसं करतील?, उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा प्रहार

“त्यांना मी विचारलं की पैसे नाहीत का? ते म्हणाले की आहेत. मग म्हटलं का थांबलंय? ५०० किमी रस्त्यांचं काम हाती घ्या. ५,५०० कोटींचे रस्त्यांचं सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. जे शिल्लक आहेत ४१३ किमी रस्ते, तेही मार्चमध्ये सुरू होईल. मुंबईतील पूर्ण रस्ते सिमेंटचे होतील. दोन वर्षात हे काम होईल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

ADVERTISEMENT

India Today Conclave 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बंडानंतरची रोखठोक मुलाखत

ADVERTISEMENT

तुम्हाला पुन्हा बोलावलं आणि विचारलं की झाले की नाही झाले तर?, असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर शिंदे म्हणाले, “जेव्हा तुम्ही मला बोलवाल. तेव्हा तुम्हाला बरंच काही बदलेलं दिसेल. मुंबईत शंभर टक्के रस्ते सिमेंटपासून बनवले जातील, तुम्हाला रस्ते शोधावे लागतील. मी हे खरं बोलतोय. मुंबईच्या सौंदर्यीकरणावरही आम्ही काम करतोय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT