मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची कोंडी, दसरा मेळाव्याला महापालिकेने परवानगी नाकारली

मुंबई तक

मुंबई: शिवसेनेचा यंदाचा मेळावा परवानगीच्या फेऱ्यात अडकला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक गोष्टींना आव्हान देत आहेत. त्याच पद्धतीनं त्यांनी दसरा मेळाव्यावरतीही आपला दावा केला आहे. शिवाजी पार्क मैदानासाठी दोन्ही गटांनी अर्ज केलेला आहे. त्यामुळे महापालिका कोणाला परवानगी देणार हे निश्चित नव्हते. म्हणून ही परवानगी लवकरात लवकर मिळावी यासाठी शिवसेनेने काल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: शिवसेनेचा यंदाचा मेळावा परवानगीच्या फेऱ्यात अडकला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक गोष्टींना आव्हान देत आहेत. त्याच पद्धतीनं त्यांनी दसरा मेळाव्यावरतीही आपला दावा केला आहे. शिवाजी पार्क मैदानासाठी दोन्ही गटांनी अर्ज केलेला आहे. त्यामुळे महापालिका कोणाला परवानगी देणार हे निश्चित नव्हते. म्हणून ही परवानगी लवकरात लवकर मिळावी यासाठी शिवसेनेने काल उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदानासाठी बीएमसीने शिवसेनेला परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सांगून ही परवानगी नाकारली आहे. शिंदे गट आणि शिवसेना दोघांनाही परवानगी नाकारली आहे.

शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा परवानगीच्या फेऱ्यात

शिवतीर्थावरती शिवसेनेचा दसरा मेळावा गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. अगोदर बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेत आहेत. परंतु शिंदे गटाने बंड केल्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेवरती आपला दावा ठोकला आहे. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक राजकीय हालचालींना एकनाथ शिंदे आव्हान देत आहेत.

एकनाथ शिंदेंनी चिन्हावर देखील दावा केलेला आहे. याअगोदर एकनाथ शिंदे गटाला बीकेसीतील मैदान मिळालेलं आहे, परंतु शिंदे गटातील नेत्यांची आणि आमदरांची इच्छा आहे की मेळावा शिवाजी पार्कवरतीच झाला पाहिजे. शिंदे गटाच्यावतीनं सदा सरवणकर यांनी महापालिकेत अर्ज केला होता. आता मैदानाचा हा वाद कोर्टात गेला आहे, त्यामुळे कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेले होतं.

आजी-माजी मुख्यमंत्री भाषणात व्यस्त, भाजपनं साधला डाव; दोन माजी आमदारांचा पक्षप्रवेश

उद्धव ठाकरेंची काल सभेत गर्जना, दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार

दरम्यान काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे ग्रुप, दसरा मेळावा, अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याचबरोबर त्यांनी भाषणात दसरा मेळाव्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल झालेल्या मुंबई गटप्रमुखांच्या सभेत दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असं जाहीर केलं होतं. आता महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली आहे, त्यामुळे शिवसेनेचं पुढचं पाऊल काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp