Nagpur : नागपुरात खळबळ! रेल्वे स्थानकावर बॅगेत सापडली स्फोटकं, पोलिसही चक्रावले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

ADVERTISEMENT

नेहमीच वर्दळ असणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर (Nagpur railway station) मध्यरात्रीच्या सुमारास स्फोटकं आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांबरोबरच (Nagpur police) बॉम्बशोधक पथक घटनास्थळी आले. त्यानंतर ५४ जिलेटिनच्या कांड्या (Gelatine sticks) असलेली स्फोटकं जप्त करण्यात आली. (Bag containing gelatin sticks, detonator found in Nagpur)

गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असलेल्या नागपूरच्या रेल्वे स्थानकावर जिवंत जिलेटिनच्या कांड्या आढलून आल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच ही बेवारस बॅग आढळली.

हे वाचलं का?

काय घडलं?

नागपूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाहतूक शाखा पोलिसांची चौकी आहे. याच चौकीच्या पाठीमागे एक बेवारस बॅग आढळली. ही बॅग उघडून बघितली असता, त्यात तब्बल ५४ जिवंत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

जिलेटिन कांड्या आढळून आल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या. त्यानंतर लगेच पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आलं. बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळावरून जिलेटिन कांड्या असलेली बॅग ताब्यात घेतली.

नागपूर शहरातील महत्त्वाच्या आणि गर्दी असणाऱ्या ठिकाणी ५४ जिवंत जिलेटिन कांड्या सापडल्यानं पोलिसही चक्रावून गेले. दरम्यान, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने या जिलेटिनच्या कांड्या ताब्यात घेतल्यानंतर सुरक्षित स्थळी नेल्या.

सीसीटीव्हीच्या मदतीने केला जाणार तपास

नागपूर रेल्वे स्थानकात जिवंत जिलेटिन कांड्या आढळून आल्यानं आता बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी ही स्फोटक कशी आली? आणि कशासाठी आणण्यात आली, अशी चर्चा होत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर कुठला घातपात करण्याचा कट तर नव्हता ना याचा तपास नागपूर पोलिसांनी सुरू केला आहे.

नागपूर पोलिसांकडून बॅग कुणी ठेवली आणि कधी ठेवली याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेज बघितलं जाणार आहे.

मोठी दुर्घटना टळली?

रेल्वे स्थानक परिसरात आढळलेल्या त्या बॅगेतील जिवंत जिलेटिनचा स्फोट घडला असता, मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, सुदैवाने त्याआधीच ही बॅग पोलिसांच्या नजरेस पडली.

या बेवारस बॅगेत आढळून आलेल्या ५४ जिलेटिन कांड्या सर्किटद्वारे डिटोनेटरला जोडलेल्या होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर आणि समोरील रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंद केली होती.

‘रेल्वे स्थानकाच्या गेटवर एका बॅग मध्ये ५४ डिटोनेटर आढळले आहेत. त्या बॅगमध्ये जिलेटिन कांड्या नाहीत. डिटोनेटरमध्ये फार कमी प्रमाणात स्फोटकं होती. म्हणजे त्यांची स्फोटाची क्षमता फार कमी होती. हे त्या ठिकाणी कुणी ठेवलं हे अजून स्पष्ट झालेलं नाही.’

‘त्या ठिकाणी ब्लास्ट करण्याचा उद्दिष्ट होता, असं वाटत नाही. रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नागपूर शहर पोलीस तपास करत आहेत. तपासात काही गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत, मात्र आता त्या गोष्टी माध्यमांना सांगता येणार नाहीत,’ असं नागपूरचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT