नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध नागपूर पोलिसांची कारवाई, १६ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संक्रांतीचा सण जवळ येताच देशभरात पतंग आणि मांजाच्या विक्रीला जोरदार प्रतिसाद मिळायला लागतो. नागपूर पोलिसांनी शहरात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर पोलिसांनी शहराच्या विविध भागात व्यापाऱ्यांवर धाडी टाकत १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

ADVERTISEMENT

पतंग कापण्याच्या चढाओढीमध्ये अनेकदा नायलॉनच्या मांज्याचा वापर केला जातो. अनेकदा या मांज्यामुळे पक्षी आणि काहीवेळा माणसांचाही जीव गेल्याचं समोर आलं आहे. तेव्हापासून नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने विविध पथकं तयार करत कारवाईला सुरुवात केली आहे. कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, धंतोली, यशोधरा नगर या ठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

वर्धा: धक्कादायक… पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोर महिला होमगार्डने स्वतःला घेतलं जाळून

हे वाचलं का?

या कारवाईत नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्याच्या प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. नुकत्याच केलेल्या कारवाईत पोलिसांनी मसूद शेख, शहाबाज शेख, अहमद इजराइल, हर्षल टापरे, निखील नेव्हरे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या ३ आठवड्यांत पोलिसांनी ३२ विक्रेत्यांवर कारवाई केल्याचं कळतंय. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडीत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. शहरात कोणीही नायलॉनच्या मांजाची विक्री करत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन यावेळी पोलिसांनी केलं आहे.

भीषण… 30 वर्षीय मुलाने चावा घेत आईची करंगळीच तोडली!

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT