इटलीत पंतप्रधान मोदींना भेटला नागपूरकर, मोदी मराठीत म्हणाले..
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटली दौऱ्यावर आहेत. इटलीमध्ये त्यांना एक नागपूरकर माणूस भेटला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्याशी मराठीत संवाद साधला. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. माजी केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे. ‘रोम’च्या रोमा रोमात वसले आहेत नरेंद्र मोदी असं कॅप्शन देऊन हा व्हीडिओ त्यांनी […]
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटली दौऱ्यावर आहेत. इटलीमध्ये त्यांना एक नागपूरकर माणूस भेटला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्याशी मराठीत संवाद साधला. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. माजी केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे. ‘रोम’च्या रोमा रोमात वसले आहेत नरेंद्र मोदी असं कॅप्शन देऊन हा व्हीडिओ त्यांनी ट्विट केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
काय आहे व्हीडिओत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोमच्या दौऱ्यावर असताना काही भारतीय त्यांच्यासमोर शंकराचं स्तोत्र म्हणतात. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी शांतपणे ऐकतात. त्यानंतर हे भारतीय भारतमाता की जय अशा घोषणा देतात. मोदी त्यांना भेटत असतानाच त्यांना या सगळ्यांमधला एकजण म्हणतो, मोदीजी नमस्कार सर मी नागपूरचा आहे. लगेच मोदी म्हणतात ‘तुम्ही नागपूरचे? काय नाव तुमचं? ‘ माझं नाव माही गुरूजी मागच्या २२ वर्षांपासून मी इथे राहतो आहे. त्यानंतर मोदी त्याच्याशी हस्तांदोलन करतात आणि पुढे जातात. तिथेही त्यांना पाहण्यासाठी गर्दी जमलेली असतेच. मग ते भारतमाता की जय असा नारा देतात. त्यांच्या पाठोपाठ इतर भारतीयही हाच नारा देतात. असं या व्हीडिओत आहे.
'रोम' के रोम-रोम में बस गये आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी!@PMOIndia @BJP4India pic.twitter.com/hYcnOQmrjR
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) October 29, 2021
नागपूरचा माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीतल्या रोम शहरात भेटला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्याशी मराठीत संवाद साधला ही बाब नागपूरकरांसाठीही खास आहे आणि आपल्या राज्यासाठीही. या व्हीडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.