मुंबई: पत्र्यावर अडकलेला बॉल काढणं बेतलं जीवावर, हाय व्होल्टेज तारेला चिकटून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
झाका मेस्त्री, नालासोपारा: पत्र्यावर अडकलेला बॉल काढण्याच्या नादात एका 10 वर्षीय मुलाने आपला हकनाक जीव गमावल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. हाय व्होल्टेज तारेला मुलाचे केस चिकटल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचं समजतं आहे. नालासोपारा पूर्वेच्या धानिव बाग परिसरातील राशीद कंपाउंडमध्ये एक 10 वर्षीय मुलगा पत्र्यावरून गेलेल्या हाय व्होल्टेज केबलला चिकटून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली […]
ADVERTISEMENT

झाका मेस्त्री, नालासोपारा: पत्र्यावर अडकलेला बॉल काढण्याच्या नादात एका 10 वर्षीय मुलाने आपला हकनाक जीव गमावल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. हाय व्होल्टेज तारेला मुलाचे केस चिकटल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचं समजतं आहे.
नालासोपारा पूर्वेच्या धानिव बाग परिसरातील राशीद कंपाउंडमध्ये एक 10 वर्षीय मुलगा पत्र्यावरून गेलेल्या हाय व्होल्टेज केबलला चिकटून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृत मुलाचं नाव प्रत्यक्ष यादव असं आहे.
प्रत्यक्ष यादव हा खेळत असताना त्याचा चेंडू हा पत्र्यावर अडकला. त्यामुळे तो अडकलेला चेंडू काढण्यासाठी प्रत्यक्ष थेट घराच्या छतावर चढला होता. पण घराच्या छतावरुन हाय व्होल्टेज केबल गेली असल्याचा कोणताही अंदाज प्रत्यक्षला आला नाही. त्यामुळे तो पत्र्यावर बिनधास्त चढला.
पत्र्यावर चढताच हाय व्होल्टेज केबलला त्याच्या केसांचा स्पर्श झाला आणि प्रत्यक्ष केबलाच चिकटला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या काही क्षणात झालेला हा प्रकार अत्यंत धक्कदायक असाच होता. नेमकं काय झालंय हे कळण्यासाठी देखील बराच वेळ गेला.










