nana kate: चिंचवडमध्ये भाजपची ‘काटें’शी टक्कर! राष्ट्रवादीने केली घोषणा
Nana Kate । Nationalist Congress Party Announced Candidate Name for Chinchwad Bypoll 2023 : लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll 2023) होत असून, भाजपने (BJP) दिवंगत जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिलीये. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही (NCP) आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी […]
ADVERTISEMENT

Nana Kate । Nationalist Congress Party Announced Candidate Name for Chinchwad Bypoll 2023 : लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll 2023) होत असून, भाजपने (BJP) दिवंगत जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिलीये. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही (NCP) आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Ncp Maharashtra State President) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली असून, नाना काटे (Nana Kate) यांना तिकीट देण्यात आलं आहे. अनेक बैठकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार घोषित केला. (Nana Kate will contest Chinchwad by election from Ncp)
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत असून, कसबा पेठ मतदारसंघातून काँग्रेसनं उमेदवार दिला आहे. तर चिंचवड मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकजण इच्छुक होते. राहुल कलाटे यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते, असं बोललं जात होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसनं आता नाना काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
चिंचवड पोटनिवडणूक : जयंत पाटलांनी केली काटेंच्या नावाची घोषणा
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी ट्विट करत काटे यांच्या नावाची घोषणा केली. पाटील म्हणाले, “चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे”, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.@OfficeofUT @NANA_PATOLE
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 7, 2023










