Narendra Giri: BJP विरोधात बोलणाऱ्या संतांच्या हत्या, यूपीत राष्ट्रपती राजवट लावा: पटोले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यूप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि उत्तरप्रदेश सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप विरोधात बोलणाऱ्या संतांची उत्तर प्रदेशमध्ये हत्या होत आहे. त्यामुळे तिथे आता राष्ट्रपती राजवट लागू केली जावी. असं नाना पटोले यावेळी म्हणाले. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उत्तरप्रदेशमध्ये जे संत भाजपचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची हत्या केली जात आहे. त्यामुळे आता तेथील परिस्थिती खूपच भयानक आहे. असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. जाणून घेऊयात या प्रकरणी नाना पटोले यांनी भाजपवर नेमके काय आरोप केले आहेत.

‘यूपीमध्येच सगळ्यात जास्त संतांच्या हत्या’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्रात अशाप्रकारे एखाद्या संताची हत्या झाली असती तर केवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं असतं. संतांची सुरक्षा महाराष्ट्रात नाही, असं दाखवण्याची व्यवस्था झाली असती. आता.. आता यूपीमध्ये काय झालं. यूपीमध्येच सगळ्यात जास्त संतांच्या हत्या होतात आणि त्या देखील भाजपच्याच काळात.’

‘त्याचं कारणच ते आहे की, जे संत यांची वास्तविकता मांडायचा प्रयत्न करतात ते संत जिवंत राहत नाहीत. अशीच परिस्थिती आज उत्तरप्रदेशमध्ये आहे. भयानक परिस्थिती आहे उत्तरप्रदेशमध्ये. तिथे तर राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे.’

ADVERTISEMENT

‘उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र गिरी यांची हत्या झाली आहे. आता त्यांची हत्या ही आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या आशावादासह हिंदू धर्मातील लोकांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सत्ता सोपवली तो आशावाद आता फोल ठरत आहे.’

ADVERTISEMENT

‘जेव्हा येथील संतांना हे समजलं की, भाजप फक्त हिंदू धर्माचा वापर करत आहे आणि सत्ता मिळाल्यानंतर याचा दुरुपयोग करतं. तेव्हा त्यांनी याबाबत बोलण्यास सुरुवात केली. पण जे संत याबाबत बोलतात त्या संतांची हत्या होते. असंच चित्र आता समोर येत आहे. त्यामुळे ज्या राज्यात संतांची हत्या होते तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली जावी अशी आमची मागणी आहे.’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचं नेमकं प्रकरण काय?

अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह प्रयागराज येथील बाघंबरी मठातील खोलीत दोरीला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.

असं सांगितलं जातं आहे की, त्यांच्या खोलीतून सुसाईड नोटही मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी शिष्य आनंद गिरी यांच्यावर त्रास देण्याचे आरोप केले आहेत.

असं सांगितलं जातं आहे की त्यांच्या खोलीतून सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी शिष्य आनंद गिरी यांच्यावर त्रास देण्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

Narendra Giri यांच्या मृत्यूवर प्रज्ञा सिंह यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या पालघर आणि या घटनेचं कनेक्शन

मुख्य आरोपी आनंद गिरीला अटक

दरम्यान, महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या संशयास्पद मृत्यूने प्रकरणी आता उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी आनंद गिरी याला अटक केली आहे. त्याला सोमवारी रात्री हरिद्वामधून ताब्यात घेण्यात आलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT