आर्यन खानचं अपहरण खंडणीसाठी झाल्याचं हायकोर्टाच्या ‘त्या’ आदेशाने स्पष्ट केलं, नवाब मलिक यांचा आरोप
आर्यन खानचं अपहरण खंडणीसाठी झाल्याचं हायकोर्टाने दिलेल्या आदेशामुळे स्पष्ट झालं असा आरोप आता नवाब मलिक यांनी केला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही. एनसीबीने केलेली कारवाई म्हणजे सगळा बनाव होता. आज हायकोर्टाने जी आदेशाची प्रत दिली आहे त्यावरून हे स्पष्ट झालं आहे असा आरोप आता नवाब मलिक यांनी केला आहे. आज […]
ADVERTISEMENT

आर्यन खानचं अपहरण खंडणीसाठी झाल्याचं हायकोर्टाने दिलेल्या आदेशामुळे स्पष्ट झालं असा आरोप आता नवाब मलिक यांनी केला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही. एनसीबीने केलेली कारवाई म्हणजे सगळा बनाव होता. आज हायकोर्टाने जी आदेशाची प्रत दिली आहे त्यावरून हे स्पष्ट झालं आहे असा आरोप आता नवाब मलिक यांनी केला आहे. आज हायकोर्टाने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कारवाईवर आरोप केला आहे.
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांना का मिळाला जामीन? काय म्हणालं बॉम्बे हायकोर्ट?
काय म्हणाले नवाब मलिक?
‘मी सुरुवातीपासून सांगितलं होतं की आर्यन खानचं अपहरण हे खंडणीसाठी करण्यात आलं होतं. आता कोर्टाच्या आदेशावरून हे स्पष्ट झालं आहे. आता समीर वानखेडे सुप्रीम कोर्टात धाव घेतील. पण मी एनसीबीला सांगू इच्छितो की हे पैसे जनतेचे आहेत. रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर हायकोर्टात धाव घेतली होती. जनतेच्या पैशांची उधळपट्टी एनसीबीने थांबवली पाहिजे’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.