‘बायकोला फक्त…’, नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

मुंबई: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे (Actor Nawazuddin Siddiqui) खासगी आयुष्य काही दिवसांपासून कठीण टप्प्यातून जात आहे. नवाजुद्दीनची घटस्फोटित पत्नी आलिया हिने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तसंच नवाजुद्दीनने आपल्याला आणि मुलांना घरातून हाकलून दिले, असाही आरोप आलियाने केला होता. (Actor Nawazuddin Siddiqui has broken his silence after his ex-wife Aaliya Siddiqui levelled several allegations against him.) […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे (Actor Nawazuddin Siddiqui) खासगी आयुष्य काही दिवसांपासून कठीण टप्प्यातून जात आहे. नवाजुद्दीनची घटस्फोटित पत्नी आलिया हिने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तसंच नवाजुद्दीनने आपल्याला आणि मुलांना घरातून हाकलून दिले, असाही आरोप आलियाने केला होता. (Actor Nawazuddin Siddiqui has broken his silence after his ex-wife Aaliya Siddiqui levelled several allegations against him.)

दरम्यान, या आरोपांवर आता नवाजुद्दीन सिद्दीकीने मौन सोडले आहे. नवाजुद्दीनने सोमवारी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करुन या आरोपांना उत्तर दिलं. त्याने या पोस्टला “हा आरोप नसून मी माझ्या भावना व्यक्त करत आहे.” असं कॅप्शन देत आलियाचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

नवाजुद्दीनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले. माझ्या मौनामुळे मला वाईट व्यक्तीचा टॅग देण्यात आला आहे. पण याचा तमाशा टाळण्यासाठी मी गप्प बसलो होतो, कारण या सगळ्या गोष्टी माझ्या मुलांना आज ना उद्या वाचायला मिळतील. खोट्या आणि एकतर्फी व्हीडियोजच्या माध्यमातून माझं चारित्र्य हनन केलं जातं आहे. ज्याचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, प्रेस आणि अनेक लोक आनंद घेत आहेत. पण काही गोष्टी मला सांगायच्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp