आर्यन खानच्या अटकेनंतर NCB चे ‘सिंघम’ समीर वानखेडे पुन्हा चर्चेत, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीशी आहे खास नातं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शनिवारी रात्री मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रूजवर छापेमारी करत NCB ने ७-८ जणांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतलं. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळचं वळण लागलं आहे. NCB ने ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई केली असून त्यात आर्यन खानचाही समावेश आहे.

ADVERTISEMENT

NCB ने ही कारवाई आपले विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यामुळे पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांमध्ये वानखेडे यांचं नाव चर्चेत आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्जमाफीयांविरुद्ध मोहीम उघडलेले समीर वानखेडे आहेत तरी कोण हे आज जाणून घेऊयात…

क्रूजवर छापेमारी करताना समीर वानखेडे स्वतः त्यात सहभागी झाले होते. याआधी अभिनेता सुशांतसिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणात अनेक ड्रग्जमाफीयांची नावं समोर आली होती. यानंतर वानखेडेंच्याच मार्गदर्शनाखाली NCB ने मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी करुन कारवाई केली होती. या नंतर वानखेडे यांना सिंघम अशी पदवी मिळाली असून बॉलिवूडमध्ये त्यांच्या नावाची दहशत असल्याचं बोललं जातंय.

हे वाचलं का?

कोण आहेत समीर वानखेडे?

महाराष्ट्राचे रहिवासी असलेले समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे IRS ऑफिसर आहेत. प्रशासकीय सेवेत लागू झाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली पोस्टींग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली होती. यानंतर आपल्या कामात दाखवलेल्या प्रावीण्यामुळे समीर वानखेडे यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीला पाठवण्यात आलं. अमली पदार्थविरोधी प्रकरणांमध्ये तपासात समीर वानखेडे यांचा विशेष हातखंडा मानला जातो.

ADVERTISEMENT

समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखालीच गेल्या दोन वर्षांत १७ हजार कोटींच्या अमली पदार्थ तस्करीचं रॅकेट उध्वस्त केलं आहे. मागच्या वर्षातच वानखेडे यांनी DRI मधून NCB मध्ये बदली करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

क्रूज ड्रग्ज पार्टी : शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही, कठोर शिक्षा झालीच पाहिजे – रामदास आठवले

बॉलिवूड सेलिब्रेटींशी थेट भिडतात समीर वानखेडे –

पहिल्यापासून समीर वानखेडे हे प्रामाणीकपणा आणि सचोटीने आपलं काम करण्याबद्दल ओळखले जातात. समोर आरोपी म्हणून कितीही मोठा व्यक्ती असला तरीही न घाबरता आपलं कर्तव्य करताना समीर वानखेडेंना आतापर्यंत अनेकदा आपण पाहिलं आहे. मुंबई विमानतळावर कार्यरत असताना वानखेडे यांनी आपल्या ज्युनिअर्सना सेलिब्रेटींच्या मागे धावण्यास मनाई केली होती. कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रेटीला समीर वानखेडे टॅक्स भरल्याशिवाय जाऊ द्यायचे नाही.

Mumbai Cruise Drugs Party: ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेला आर्यन खान आहे तरी कोण?

परदेशातून भारतात येत असताना तुम्ही ३५ हजाराचं सामान बरोबर घेऊन येऊ शकता. त्यापेक्षा जास्त किमतीचं सामान जर तुम्ही घेऊन येणार असाल तर तुम्हाला ३६ टक्के कस्टम ड्युटी भरावी लागते. ५ लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तु जर तुम्ही सोबत घेऊन येत असाल तर तुम्हाला अटकही होऊ शकते. अनेकदा ही कस्टम ड्युटी चुकवण्यासाठी अनेकजणं विविध युक्त्या आजमावत असतात.

Drugs Case मध्ये आर्यनचं नाव, शाहरुख ‘पठाण’ सिनेमाचं स्पेनमधलं शुटींग रद्द करण्याची शक्यता

मीच इथला बॉस आहे !

वानखेडे यांनी एका मुलाखतीत एअरपोर्टवर बॉलिवूड स्टार्सच्या नखऱ्यांबद्दल सांगितलं होतं. विमानतळावर बॉलिवूड स्टार्स आपल्या सहायक्कांकडून सामान उचलवून घेतात. परदेशातून जास्त सामान घेऊन येण्यापासून कोणती अडचण येऊ नये यासाठी सेलिब्रेटी असं करतात असं वानखेडे म्हणाले होते. वानखेडे यांनी या नियमांत बदल करत प्रत्येकाने आपलं सामान स्वतः उचलायचं असं जाहीर केलं. यानंतर अनेक सेलिब्रेटींनी मला आम्ही तुमच्या बॉसकडे तक्रार करु अशी धमकीही दिली पण ज्यावेळी मी त्यांना सांगितलं की मीच इथला बॉस आहे त्यावेळी त्यांना नियम पाळण्याशिवाय पर्याय नव्हता.

एकदा समीर वानखेडे यांचं एका दिग्गज क्रिकेटपटूचा अभिनेता मुलगा आणि एका क्रिकेटच्या पत्नीसोबत जोरदार भांडण झालं होतं. हे भांडण वाढायला लागल्यानंतर वानखेडेंनी दोघांनाही टॅक्स चोरीच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करु शकतो असं सांगितलं. ज्यानंतर हे प्रकरण शांत झालं आणि दोघांनीही दंड भरला.

‘तो ड्रग्ज घेऊ शकतो, सेक्स करु शकतो’, आर्यनबद्दल शाहरुखचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

२०११ क्रिकेट विश्वचषकादरम्यान एका प्रसिद्ध क्रिकेटपटूलाही वानखेडे यांनी आपला इंगा दाखवत त्याच्याकडून कस्टम ड्युटी वसूल केली होती. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही समीर वानखेडे यांची पत्नी असून २०१७ साली दोघांचं लग्न झालं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT