Sameer Wankhede: समीर वानखेडेंना NCB मध्ये पुन्हा मुदतवाढ, आर्यन खानच्या अडचणी वाढणार?
मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 6 महिने तरी ते याच पदावर कायम राहणार आहे. त्यांना मिळालेली ही मुदतवाढ आता बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासाठी अधिक अडचणीची ठरु शकते. क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खान हा सध्या तुरुंगात असून त्याच्या […]
ADVERTISEMENT
मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 6 महिने तरी ते याच पदावर कायम राहणार आहे. त्यांना मिळालेली ही मुदतवाढ आता बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासाठी अधिक अडचणीची ठरु शकते. क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खान हा सध्या तुरुंगात असून त्याच्या अटकेत समीर वानखेडे यांची महत्त्वाची भूमिका होती.
ADVERTISEMENT
समीर वानखेडे यांना मिळालेल्या मुदतवाढीमुळे क्रूझ ड्रग्स प्रकरण त्यांना तडीस लावत येणार आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खान याला 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने तो सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये समीर वानखेडे यांचा मोठा सहभाग होता. त्यामुळेच आता समीर वानखेडे यांना मिळालेली मुदतवाढ ही आर्यन खानसाठी डोकेदुखी ठरू शकते.
जाणून घ्या समीर वानखेडे?
हे वाचलं का?
महाराष्ट्राचे रहिवासी असलेले समीर वानखेडे 2008 च्या बॅचचे IRS ऑफिसर आहेत. प्रशासकीय सेवेत लागू झाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली पोस्टींग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली होती. यानंतर आपल्या कामात दाखवलेल्या प्राविण्यामुळे समीर वानखेडे यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीला पाठवण्यात आलं. अमली पदार्थविरोधी प्रकरणांमध्ये तपासात समीर वानखेडे यांचा विशेष हातखंडा मानला जातो.
समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखालीच गेल्या दोन वर्षांत 17 हजार कोटींच्या अमली पदार्थ तस्करीचं रॅकेट उध्वस्त केलं आहे. मागच्या वर्षातच वानखेडे यांनी DRI मधून NCB मध्ये बदली करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पहिल्यापासून समीर वानखेडे हे प्रामाणिकपणा आणि सचोटीने आपलं काम करण्याबद्दल ओळखले जातात. समोर आरोपी म्हणून कितीही मोठा व्यक्ती असला तरीही न घाबरता आपलं कर्तव्य करताना समीर वानखेडेंना आतापर्यंत अनेकदा आपण पाहिलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबई विमानतळावर कार्यरत असताना वानखेडे यांनी आपल्या ज्युनिअर्सना सेलिब्रेटींच्या मागे धावण्यास मनाई केली होती. कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रेटीला समीर वानखेडे टॅक्स भरल्याशिवाय जाऊ द्यायचे नाही.
परदेशातून भारतात येत असताना तुम्ही हजाराचं सामान बरोबर घेऊन येऊ शकता. त्यापेक्षा जास्त किमतीचं सामान 35 जर तुम्ही घेऊन येणार असाल तर तुम्हाला 36 टक्के कस्टम ड्युटी भरावी लागते.
5 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तु जर तुम्ही सोबत घेऊन येत असाल तर तुम्हाला अटकही होऊ शकते. अनेकदा ही कस्टम ड्युटी चुकवण्यासाठी अनेकजणं विविध युक्त्या आजमावत असतात.
2011 साली क्रिकेट विश्वचषकादरम्यान एका प्रसिद्ध क्रिकेटपटूलाही वानखेडे यांनी आपला इंगा दाखवत त्याच्याकडून कस्टम ड्युटी वसूल केली होती. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही समीर वानखेडे यांची पत्नी असून 2017 साली दोघांचं लग्न झालं होतं.
धक्कादायक आरोप! समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांकडून पाळत; NCB ची पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार
समीर वानखेडेंनी आतापर्यंत ‘या’ पदावर केलंय काम
समीर वानखडे यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या आणि मोठ्या पदावर काम केलं आहे. सुरुवातीला ते एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) चे उपायुक्त होते. त्यानंतर ते राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक होते. त्यानंतर ते महसूल गुप्तचर संचालनाय (DRI)चे संयुक्त आयुक्त होते. तर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)चे विभागीय संचालक आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT