….आणि भरसभेत अजित पवारांनी म्हटलं गाणं, “चिठ्ठी आयी है…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या खास भाषणशैलीसाठी ओळखले जातात. रोखठोक भाषण आणि वेगाने काम करण्याची त्यांची शैली महाराष्ट्राला माहित आहे. आज अजित पवार यांनी उस्मानाबादमध्ये आपल्या याच शैलीचं दर्शन घडवलं. एवढंच काय त्यापुढे जात त्यांनी चक्क गाणंही म्हटलं. ज्याचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर आणि ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला आहे. अजितदादांनी चिठ्ठी आयी है आयी है असं गाणं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ADVERTISEMENT

नेमकं काय घडलं की अजित पवारांनी गुणगुणलं गाणं?

अजित पवारांचं उस्मानाबादमध्ये भाषण सुरू होतं. त्यावेळी एका कार्यकर्त्याने अजित पवारांना चिठ्ठी पाठवली. त्या चिठ्ठीतून आपला प्रश्न मांडण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्याने केला. अजित पवारांनी भाषण थांबवलं आणि कार्यकर्त्याची चिठ्ठी द्या रे म्हणत चिठ्ठी आयी है आयी है चिठ्ठी आयी है या गाण्याच्या ओळी गुणगुणल्या ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. कार्यकर्त्यांनी आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि शिट्ट्याही वाजवल्या.

पुढे काय घडलं, काय म्हणाले अजितदादा?

सुरक्षा रक्षकाने अजित पवारांकडे चिठ्ठी आणून दिली. ज्यानंतर अजित पवारांनी ही चिठ्ठी वाचून मी यामध्ये लक्ष घालतो असं आश्वासन कार्यकर्त्याला दिलं. एवढंच नाही तर मी साखर आयुक्तांशीही बोलतो. हे चुकीचं आहे. राणांचा कारखाना असो किंवा कुणाचाही कारखाना असो भाव दिलाच पाहिजे. राणा भाजपमध्ये गेले असले तरीही आमचं बोलणं सुरू आहे. मी त्यांच्याशीही बोलेन मी त्यांना विचारेन की उसाच्या दरांबाबतची वस्तुस्थिती काय? असंही अजित पवार सांगायला विसरले नाहीत.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका

विरोधी पक्षनेते अजित पवार उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. आपल्या भाषणात त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कोणीही कोणचा कायमचा विरोधी नसतो. सत्तेच्या लाटा येतात आणि जातात. त्यामुळे मी कधीही भेदभाव करत नाही. त्यामुळे अनेक वेळेला आमदार झालो असंही अजित पवार यावेळी म्हणाले. तसंच राष्ट्रवादीचे नेतेच म्हणत असतील की आपला पक्ष संपला तर कसं होणार हे म्हणत त्यांनी प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांचेही कान टोचले.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली. पण त्यांच्या मुलाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काही लोक कोणत्याही थराला गेले. आम्ही वेगळ्या विचारांचे होतो तरीही सरकार चालवलं असाही चिमटा त्यांनी एकनाथ शिंदे यांना काढला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT