NCP leader Eknath Khadse यांची ED कडून तब्बल 9 तास चौकशी, पुढे काय?
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची 8 जुलै रोजी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) यांच्याकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. पुण्यातील भोसरी एमआयडीसीमधील जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात ही चौकशी करण्यात आली. तब्बल 9 तास ही चर्चा सुरु होती. दरम्यान, ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांच्या वकिलांनी […]
ADVERTISEMENT
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची 8 जुलै रोजी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) यांच्याकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. पुण्यातील भोसरी एमआयडीसीमधील जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात ही चौकशी करण्यात आली. तब्बल 9 तास ही चर्चा सुरु होती.
ADVERTISEMENT
दरम्यान, ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांच्या वकिलांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
पाहा खडसेंच्या वकिलांनी नेमकी काय माहिती दिली:
हे वाचलं का?
‘एकनाथ खडसेंची चौकशी झाली आहे. चौकशीमध्ये आम्ही सर्व संपत्तीबद्दल माहिती दिलेली आहे. जे स्टेटमेंट होते ते आम्ही पुन्हा तपासले आहेत. तसंच ईडीच्या अधिकाऱ्यांना जे कागदपत्र हवे आहेत ते देखील देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण सहकार्य करत आहोत. तसेच त्यांना अधिकचे जे कागदपत्र हवे आहेत ते आम्ही त्यांना 10 दिवसात देणार आहोत.’
‘यानंतर ईडीच्या कार्यालयात जेव्हा कधी बोलविण्यात येईल तेव्हा-तेव्हा आम्ही उपस्थित राहू असं ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. आता पुन्हा तरी बोलावलेलं नाही. जेव्हा त्यांना गरज भासेल तेव्हा ते खडसे साहेबांना बोलावू शकतात.’ अशी माहिती खडसेंच्या वकिलांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, याच प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मंगळवारी ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
गिरीश चौधरी यांची चौकशी मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरु होती. चौधरी यांनी आणलेली कागदपत्र तपासण्यात आल्यानंतर ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर बुधवारी त्यांना तात्काळ त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. त्यामुळे गुरुवारी एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात हजर राहिले.
भोसरी MIDC भूखंड प्रकरण नेमकं काय आहे?
एकनाथ खडसे हे 2016 साली राज्याचे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्व्हे क्रमांक 52/2 अ/ 2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे खरेदी केला होता.
या भूखंडाचा व्यवहार 3 कोटी 75 लाख रूपयांना अकानी नावाच्या व्यक्तीकडून खरेदी करण्यात आला होता. पण या भूखंडाचा सातबारा MIDC च्या नावावर असल्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला होता.
ED ने अटक केलेले गिरीश चौधरी कोण आहेत? काय आहे भोसरी चा भूखंड घोटाळा, जाणून घ्या…
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. एप्रिल 2017 मध्ये ACB ने म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि अकानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला चौकशीही सुरू केली. मात्र 2018 मध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात आली होती.
दरम्यान, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यासाठी झोटिंग समितीही नेमण्यात आली. या समितीमार्फत प्रकरणाची चौकशी झाली. पण त्यांचा अहवाल काही अद्याप समोर आलेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT