राष्ट्रवादी काँग्रेस आज NCB आणि समीर वानखेडेंविरोधात कोणता नवा गौप्यस्फोट करणार?
मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी कारवाई करुन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केली. मात्र, NCB ने केलेल्या या संपूर्ण कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने सवाल विचारले जात आहेत. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसने असा आरोप देखील केला आहे की, ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक षडयंत्र असून तो छापा […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी कारवाई करुन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केली. मात्र, NCB ने केलेल्या या संपूर्ण कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने सवाल विचारले जात आहेत. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसने असा आरोप देखील केला आहे की, ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक षडयंत्र असून तो छापा देखील बनावट होता. याचबाबत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे आज (14 ऑक्टोबर) नवी पोलखोल करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, आज (14 ऑक्टोबर) पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस NCB वर निशाणा साधणार आहे. यावेळी एनसीबीची आणखी एक पोलखोल करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. याबाबतची माहिती देतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्रकार परिषदेचा विषय हा ‘एनसीबीची आणखी एक पोलखोल’ असा असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
क्रूझ ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत NCB आणि अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बरेच आरोप केले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आता नेमके कोणते आरोप करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.