टिटवाळ्यात दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडले, सीसीटीव्हीत घटना कैद
मिथिलेश गुप्ता, टिटवाळा: टिटवाळा या ठिकाणी घराच्या परिसरात खेळत असताना एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडल्याची धक्कादायक घटना बल्याणी भागात घडली आहे. टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणाने दीड वर्षाच्या बालकाचा जीव घेतला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत टेम्पो चालक सैफ फारुखी याला अटक केली असून त्याची […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, टिटवाळा: टिटवाळा या ठिकाणी घराच्या परिसरात खेळत असताना एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडल्याची धक्कादायक घटना बल्याणी भागात घडली आहे. टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणाने दीड वर्षाच्या बालकाचा जीव घेतला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत टेम्पो चालक सैफ फारुखी याला अटक केली असून त्याची जामिनावर सुटका झाली आहे.
ADVERTISEMENT
कल्याणजवळ असलेल्या बल्याणी परिसरात उमर शहा हा आपली पत्नी गुलशन, सात वर्षाचा मुलगा, 3 वर्षाची मुलगी व दीड वर्षाचा मुलगा यांच्यासोबत राहतो. उमर विक्रोळी येथे कामाला असून 24 तारखेला नेहमीप्रमाणे सकाळी ते कामावर निघून गेले. त्यानंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उमर यांची तिन्ही मुलं घराच्या बाजूला असलेल्या मैदानात टेम्पो शेजारी खेळत होती. याच दरम्यान टेम्पो चालक आला आणि थेट टेम्पोत बसून टेम्पो पुढे नेला. मात्र या टेम्पो चालकाचा निष्काळजीपणा शेजारी खेळत असलेल्या दीड वर्षाच्या बालकाच्या जीवावर बेतला. टेम्पो शेजारी खेळत असलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावरून टेम्पोचं चाक गेलं.
या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या बालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात टेम्पो चालक सैफ फारुखी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला टिटवाळा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT