राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या

ADVERTISEMENT

‘या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आज मंत्रिमंडळ बैठकीत कोव्हिड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रिमंडळास दिली. 

हे वाचलं का?

कोव्हिड परिस्थिती युरोपमध्ये बिकट होत असून आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे, कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा करण्यात आली.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रूग्णालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे प्रेस नोट काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे. मानेच्या दुखण्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उद्धव ठाकरे हे रूग्णलयात दाखल झाले आहेत.

ADVERTISEMENT

जनतेला उद्देशून काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी; लवकरच मिळणार डिस्चार्ज

याच महिन्यात 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंढरपूर येथील चौपदरी मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीवरून हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या मानेल पट्टा लावण्यात आलेला होता. त्यामुळे त्यांना मानदुखीचा त्रास सुरू झाल्याचं दिसत होतं. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसतानाही ते कार्यक्रमाला हजर राहिल्याचा आवर्जून उल्लेख केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT