iPhone 12 Mini 30 हजारात विकत घेण्याची संधी, नेमकं डील काय?
मुंबई: जर आपण iPhone खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आता एक चांगली संधी आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Flipkart) 7 ते 8 डिसेंबर दरम्यान एक सेल असणार आहे. या सेल दरम्यान तुम्ही iPhone 12 Mini स्वस्तात खरेदी करू शकता. Flipkart च्या या सेलमध्ये iPhone 12 Mini च्या बेस व्हेरिएंटमध्ये 64GB स्टोरेज आहे. येथे या […]
ADVERTISEMENT
मुंबई: जर आपण iPhone खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आता एक चांगली संधी आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Flipkart) 7 ते 8 डिसेंबर दरम्यान एक सेल असणार आहे. या सेल दरम्यान तुम्ही iPhone 12 Mini स्वस्तात खरेदी करू शकता.
ADVERTISEMENT
Flipkart च्या या सेलमध्ये iPhone 12 Mini च्या बेस व्हेरिएंटमध्ये 64GB स्टोरेज आहे. येथे या स्मार्टफोनची विक्री 44,999 रुपयांना केली जात आहे. ज्याची मूळ किंमत 59,900 रुपये आहे. पण यावर एक्सचेंज ऑफर देखील सुरू आहे.
एक्सचेंज ऑफरच्या अंतर्गत, तुम्ही जुना आयफोन एक्सचेंज करू शकता आणि 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत iPhone 12 Mini खरेदी करू शकता. कारण इथे एक्सचेंज ऑफर अंतर्गत तब्बल 10,050 रुपयांची सूट देण्यात येत आहे.
हे वाचलं का?
तुम्ही फ्लिपकार्टच्या बँक ऑफरचाही लाभ घेऊ शकता. तुम्ही Paylater द्वारे देखील काही पैसे वाचवू शकता. याशिवाय, जर तुमच्याकडे फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 5% कॅशबॅक देखील दिला जाईल.
याशिवाय जर तुम्ही Amex नेटवर्क कार्ड वापरून आयफोन खरेदी केल्यास 20% पर्यंत कॅशबॅक देखील मिळवू शकता. पण तो फक्त पहिल्या ट्रांझेक्शनसाठीच लागू होईल. कॅनरा बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून खरेदी केल्यास त्यावरही तुम्हाला काही सूट मिळू शकते.
ADVERTISEMENT
iPhone 12 Mini बद्दल बोलायचे झाले तर हा एकंदरीत चांगला स्मार्टफोन आहे. हा एक वेगवान प्रोसेसर, कॉम्पॅक्ट फोन आहे आणि तो लुक-फीलच्या बाबतीतही उत्तम आहे. त्याचा सर्वात मोठा दोष म्हणजे त्याची बॅटरी लाइफ.
ADVERTISEMENT
जर तुमच्यासाठी बॅटरी बॅकअप फारसा महत्त्वाचा नसेल आणि तुम्हाला कॉम्पॅक्ट स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर ही डील तुमच्यासाठी चांगली ठरू शकते.
या फोनमध्ये 5.4 इंच डिस्प्ले आणि ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तसंच हा स्मार्टफोन 5G ला देखील सपोर्ट करतं. यामध्ये तुम्हाला इतर लेटेस्ट आयफोन्सप्रमाणे फेस आयडीचा सपोर्ट देण्यात आला आहे.
Apple: तुमचा iPhone खरा आहे की खोटा, कसं ओळखाल?
iPhone 12 mini च्या इतर फिचर्सचा विचार केल्यास त्यात यूजर्सला OLED सुपर रेटिना डिस्प्ले आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी देखील सपोर्ट मिळेल. हा फोन A14 Bionic प्रोसेसर सह येतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT