बजेटनंतर अजित पवारांनी महाराष्ट्राला दिली ‘शॉक’ देणारी बातमी…

मुंबई तक

Ajit Pawar reaction on Maharashtra Budget : मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर होताच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संपूर्ण महाराष्ट्राला शॉक देणारी बातमी दिली. २५ मार्चला अधिवेशन संपताचं १ एप्रिलपासून महाराष्ट्रात ३० ते ३५ टक्के वीज दरवाढ होणार असल्याचा गौप्यस्फोट पवारांनी केला. युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सादर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Ajit Pawar reaction on Maharashtra Budget :

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर होताच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संपूर्ण महाराष्ट्राला शॉक देणारी बातमी दिली. २५ मार्चला अधिवेशन संपताचं १ एप्रिलपासून महाराष्ट्रात ३० ते ३५ टक्के वीज दरवाढ होणार असल्याचा गौप्यस्फोट पवारांनी केला. युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सादर केला. यानंतर अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना अजित पवार बोलत होते. (Opposition Leader Ajit Pawar reaction on budget presented by Finance Minister Devendra Fadnavis)

अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला :

अजित पवार म्हणाले, आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ चुनवी जुमला आहे. दुरदृष्टीचा अभाव, वास्तवाचा भान नसलेला हा अर्थसंकल्प आहे. स्वप्नांचे इमेले, शब्दांचे फुलेरे आणि घोषणांचा सुकाळ या अर्थसंकल्पात आहे. राज्याची परिस्थिती किती, उत्पन्न किती? पैसा कसा येणार आहे, खर्च किती होणार आहे? याचा ताळमेळ नाही, राज्याची परिस्थिती पाहिल्यास राज्य कर्जबाजारी होत आहे. साडेसहा लाख कोटींच्या पुढे कर्ज गेलेलं आहे. त्याबद्दल ठोसं असं काही सांगायला अर्थमंत्री तयार नाहीत, अशी टीका पवारांनी केली.

विकासाचं पंचामृत कधी दिसणार नाही :

बोलणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्या बरं वाटवं यासाठी आतापर्यंत जशा घोषणा दिल्या गेल्या तशा घोषणांची पुनरावृत्ती आज घडून आली आहे. माझ्याकडे गत अर्थसंकल्पाची प्रत आहे. आम्ही त्यात विकासाची पंचसुत्री दिली होती. आता यांनी पंचामृत आणलं आहे. वास्तविक अमृत कधी कोणी बघितलेलं नाही. फक्त ऐकत आलो आहे. तसंच हे विकासाचं पंचामृत कधी दिसणार नाही. फक्त ऐकतं राहायचं आणि जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न करायचा, असाही हल्लाबोल पवारांनी केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp