Jogendra Kawade : बाळासाहेबांची शिवसेना-कवाडे गटाची युती
मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी एकत्र येत युतीची घोषणा केली. आज (बुधवारी) मुंबईत या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी भविष्य काळात गोरगरीबांच्या आणि वंचितांच्या हक्कासाठी एकत्र काम करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची […]
ADVERTISEMENT
मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी एकत्र येत युतीची घोषणा केली. आज (बुधवारी) मुंबईत या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी भविष्य काळात गोरगरीबांच्या आणि वंचितांच्या हक्कासाठी एकत्र काम करणार असल्याची ग्वाही दिली.
ADVERTISEMENT
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची युती झाली आहे. आमचा संघर्ष साधा सोप्पा नव्हता, तुम्हा सर्वांना इतिहास माहित आहे. कवाडे यांनीही मोठा संघर्ष केला आहे. इथे कोणी देण्याघेण्याासाठी आलेले नाहीत. तुम्ही अर्थ जोडू नका. ज्यांना आमच्या पक्षाचे विचार पटतील त्यांचं स्वागत आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडेंच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तारावेळच्या ऐतिहासिक लॉंग मार्चची आठवण काढली. तसंच आता हा लॉंग मार्च योग्य ठिकाणी पोहचला असल्याचही म्हणाले.
हे वाचलं का?
कवाडेंकडून मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक :
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे यांनी महाराष्ट्राला एक धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे. असं म्हणतं एकनाथ शिंदेवर स्तुतीसुमन उधळली. ते म्हणाले, शिंदे सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्माला आलेले नाहीत. काही जण काम आणि त्यागातून लिडर होता, म्हणून लिडर झाले आहेत. शिंदेही भीम सैनिकांप्रमाणे संघर्षातून वर आले आहेत. त्यामुळे या युतीचा अभिमान आहे, असं त्यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरेंवर टीका :
या पत्रकार परिषदेत जोगेंद्र कवाडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, “नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र पाडण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिले होते. आम्ही याविरोधात आंदोलन केली. आदित्य ठाकरे यांची भेटही मागितली. पण मिळाली नाही. त्याचवेळी शिंदेंना भेटलो तर ते पटकन म्हणाले, बाबासाहेबांच्या नावाची वास्तू तुटतेच कशी? हा दोघांमधला फरक आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना – आंबेडकर युतीला पर्याय ठरणार?
मागील काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीची चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्ष याबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं जातं आहे. केवळ वंचित बहुजन महाविकास आघाडीत येणार की शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणून राहणार याबाबत चर्चा अडल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
त्याबाबतही लवकरच निर्णय होईल असं सुतोवाच स्वतः वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे भविष्यातील या युतीला शिंदे-कवाडे गटाची युती उत्तर किंवा पर्याय ठरणार का असा सवाल विचारला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT