Crime : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर पुष्पा स्टाईल कारवाई, 25 कोटी रुपयांचे चंदन जप्त; पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आरोपी अटक
दहशतवाद विरोधी पथकानं जप्त केलेल्या चंदनाचं वजन दहा ते बारा टन असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अर्पित सिंग नावाच्या व्यक्तीला आणि कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

चंदनाची तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई

पोलिसांकडून चंदन जप्त, 25 कोटीपर्यंत असू शकते किंमत
Pimpri Chincwad Police : पुणे-मुंबूई द्रूतगती महामार्गावर पुष्पा चित्रपटासारखा सिन पाहायला मिळाला. पण या कारवाईत आरोपी नाही, तर पोलीस हिरो ठरल्याचं दिसतंय. कारण दहशतवाद विरोधी पथकानं केलेल्या या कारवाईमध्ये कोट्यवधी रुपयांचं चंदन जप्त केलं आहे. रविवारी दुपारी ही कारवाई झाली.
हे ही वाचा >> Beed : "न्याय मिळेपर्यंत लढणार, डेड बॉडी परत आली तरी चालेल", मृत महादेव मुंडेंच्या पत्नीचं आजपासून आमरण उपोषण
दहशतवाद विरोधी पथकानं जप्त केलेल्या चंदनाचं वजन दहा ते बारा टन असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अर्पित सिंग नावाच्या व्यक्तीला आणि कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील उर्से टोल नाक्यावर खंडणीविरोधी पथकाने मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर पकडला. कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
चंदन कसं लपवलं होतं?
हे ही वाचा >> Pune : पोलीस आणि दरोडेखोर आमने-सामने, कोयत्यांना गोळीबाराने उत्तर, थरारात पोलीस जखमी, आरोपी अटक
कंटेनरमध्ये नारळाच्या दोरीखाली लपवून चंदनाची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांना आढळून आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या अंदाजित माहितीवरुन दहा ते बारा टन चंदनाचे लाकूड असू कंटेनरमध्ये असू शकतं. या चंदनाची किंमत सुमारे 20 ते 25 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी अर्पित सिंग नावाच्या व्यक्तीला आणि कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे. शेवटी हा चंदन कुठे जात होता? हे स्पष्ट नाही. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.
दुसरीकडे दरोडेखोरांसोबत चमक
काही दिवसांपूर्वी पुण्यातील चाकणमध्ये असलेल्या बहुलमध्ये एका वृद्ध जोडप्याच्या घरात सहा दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटमार केली. त्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.