ज्ञानोबा-तुकाराम…! पंतप्रधान मोदी बनले वारकरी, पण कारण काय?

मुंबई तक

पंतप्रधान मोदी यांचे वारकऱ्यांच्या रुपातील फोटो बघून तुम्हालाही मोदींनी असं वेशभूषा करण्याचं निमित्त काय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल? संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच झालं. या पालखी मार्गांयाबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे त्यांची भेट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंतप्रधान मोदी यांचे वारकऱ्यांच्या रुपातील फोटो बघून तुम्हालाही मोदींनी असं वेशभूषा करण्याचं निमित्त काय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल?

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच झालं.

या पालखी मार्गांयाबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेतली.

वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे तुकोबारायांची पगडी, उपरणे, वीणा, चिपळ्या तसेच गाथा देऊन तसेच तुळशीहार घालुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना श्रीक्षेत्र देहु येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण दिलं.

या शिष्टमंडळात संत तुकाराम महाराज संस्थान देहुचे अध्यक्ष नितीन मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य शिवाजी महाराज मोरे आणि तुषार भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp