Narendra Modi Speech : २५ वर्षांसाठी ५ संकल्प! लालकिल्ल्यावरून मोदींनी देशाला काय सांगितलं?
आज (15ऑगस्ट २०२२) देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण पार पडलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या भाषणात मोदींनी पुढच्या २५ वर्षांसाठी ५ संकल्प करण्याचं आवाहनं देशवासियांना केलं. १५ ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण केल्यानंतर लालकिल्ल्यावरुन बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर संपूर्ण जगाचा […]
ADVERTISEMENT
आज (15ऑगस्ट २०२२) देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण पार पडलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या भाषणात मोदींनी पुढच्या २५ वर्षांसाठी ५ संकल्प करण्याचं आवाहनं देशवासियांना केलं.
ADVERTISEMENT
१५ ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण केल्यानंतर लालकिल्ल्यावरुन बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर संपूर्ण जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला आहे. भारताच्या भूमीत जग समस्यांवर उपाय शोधत आहे. ७५ वर्षांच्या वाटचालीचा परिपाक म्हणजे जगाची बदलेली भूमिका आणि बदलेला विचार आहे.”
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात पुढील २५ वर्षांसाठी देशवासियांना पाच संकल्प करण्याचं आवाहन केलं. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले, “पुढील २५ वर्षांसाठी आपल्याला आपली शक्ती आणि सामर्थ्य पाच संकल्पावर केंद्रीत करावी लागेल. आपला अनुभव सांगतो की, जेव्हा आपण संकल्प घेऊन वाटचाल करतो, तेव्हा निश्चित ध्येय गाठतोच.”
हे वाचलं का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणते पाच संकल्प सांगितले?
१) विकसित भारत
२) गुलामीगिरीच्या विचारातून पुर्णपणे मुक्ती
ADVERTISEMENT
३) आपल्या वारशावर गौरव करा
ADVERTISEMENT
४) एकता आणि एकजुटता
५) नागरी कर्तव्यांचं पालन
नरेंद्र मोदी भाषण – विकसित भारत
स्वच्छ भारत, लसीकरण, अडीच कोटी लोकांना वीज कनेक्शन, उघड्यावर शौचास जाण्यापासून पुर्णपणे मुक्ती, रिन्युव्हल एनर्जी या सर्व गोष्टी पुर्णत्वास नेण्यासाठी संकल्प करूया.
गुलामगिरीच्या विचारातून पूर्णपणे मुक्ती
राष्ट्रीय शिक्षण धोरण गुलामगिरीच्या विचारातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. आपल्याला सर्व प्रकारच्या गुलामीतून मुक्त होण्याची गरज आहे. आपल्याला देशातील प्रत्येक भाषेचा अभिमान असायला हवा. डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप हे देशातील नव्याने उदयास येत असलेल्या विचारांचा आणि शक्तीचा परिणाम आहे. आपल्या सर्व प्रकाराच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची गरज आहे.
आपल्या वारशांचा अभिमान हवा
जेव्हा आपल्या भूमीशी जोडून घेऊ, तेव्हाच उंच उडू शकू. तेव्हाच आपण जगाला समस्यांवरील उपाय सांगू शकू. त्यामुळे आपल्या वारशांचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. एकत्र कुटुंब पद्धती आपल्या वारशाचाच भाग आहे. पर्यावरण संवर्धनाचा वारसा आपल्याला मिळालेला आहे.
एकता आणि एकात्मता
आपल्याला आपली विविधतेचा उत्सव करायचा आहे. स्त्री-पुरुष समानता, प्रथम राष्ट्र, कष्टकऱ्यांचा सन्मान याचाच भाग आहे. स्त्रियांचा अपमान एक विकृती आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला मार्ग शोधावा लागेल.
नागरिकांची कर्तव्ये
जबाबदार नागरिक विकासाचा रस्ता निर्माण करत असतात. हीच मूळ संकल्प शक्ती आहे. विजेची बचत, शेतामध्ये पाण्याचा पूर्णपणे वापर करणे, रसायने मुक्त शेती या सगळ्या गोष्टी करणे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT