PM Modi UNGA: संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

PM Modi UNGA: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान आता पंतप्रधान मोदी हे संयुक्त राष्ट्र महासभेला (UNGA)संबोधित करताना पाकिस्तानचं नाव न घेताही त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

या संबोधनात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. जगभरातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान आणि पंतप्रधान इम्रान खान यांचं नाव न घेता मोदींनी बऱ्याच गोष्टी सुनावल्या. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, जे लोकं दहशतवादाचा वापर करत आहेत त्यांच्यासाठीच हा दहशतवाद धोका ठरणार आहे.

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलतांना मोदी म्हणाले की, ‘जे देश दहशतवादाचा राजकीय भांडवल म्हणून वापर करत आहेत त्यांना समजून घ्यावं लागेल की, दहशतवाद हा त्यांच्यासाठी देखील तेवढाच मोठा धोका आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी असंही म्हणाले की, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर हा दहशतवादासाठी होता कामा नये.

पंतप्रधान मोदींनी यावेळी असं म्हटलं की, ‘हे सुनिश्चित केलं पाहिजे की, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर हा दहशतवादासाठी होता कामा नये. त्यामुळे आपल्याला देखील सतर्क राहणं गरजेचं आहे. तेथील नाजूक परिस्थितीचा कोणत्याही देशाने आपल्या स्वार्थासाठी वापर करु नये. सध्या अफगाणिस्तानची जनता, महिला, अल्पसंख्यांक यांना मदत करणं ही आपली जबाबदारी आहे.’

ADVERTISEMENT

कोरोना, कोव्हिड लसीचा मुद्दा देखील केला उपस्थित

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात कोरोना व्हायरस, लस यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ‘सेवा परमो धर्म: यासह भारत मर्यादित संसाधने असून लस तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे.’ यावेळी पंतप्रधान मोदींनी जगातील सर्व लस उत्पादकांना भारतात लस उत्पादनासाठी आवाहन केलं आहे. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाने मृत्यू पावलेल्या जगभरातील सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

स्नेहा दुबे यांनीही सुनावलं इम्रान खान यांना

पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पुन्हा एकदा काश्मीरबाबत सूर आळवला होता. पण नेहमीप्रमाणे या वेळीही त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे (Sneha Dubey) यांनी स्पष्टपणे सांगितले की, दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा देणं हा आजवरचा पाकिस्तानचा इतिहास आहे.

स्नेहा दुबे यांनी उत्तर देण्याचा अधिकार (Right to Reply) वापरून उत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘पाकिस्तानच्या नेत्याने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर करून माझ्या देशाविरुद्ध खोटा आणि द्वेष भावनेने प्रचार करण्याची ही काही पहिली वेळ नाही.

आपल्या देशातील वाईट परिस्थिती जगाला दिसू नये यासाठी पाकिस्तानी नेते संपूर्ण जगाचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. जिथे दहशतवादी मुक्तपणे फिरतात. तर सामान्य नागरिक, विशेषत: अल्पसंख्यांक समाजातील लोकांवर अत्याचार केले जातात.’ असं चोख उत्तर स्नेहा दुबे यांनी दिलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदल्या दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. कोरोना, हवामान बदल, दहशतवाद यासह विविध मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी दोघांमध्ये चांगलं बाँडिंग पाहायला मिळालं. आपल्या अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचीही भेट घेतली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT