रेखा जरे हत्या : मुख्य सूत्रधार बाळ बोठेला हैदराबादमध्ये अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अटक करण्यात आली आहे. हैदराबादमधून बाळ बोठेला अटक करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे पोलिसांनी ही कारवाई केली. मागील पाच दिवसांपासून पोलिसांची सहा पथकं बाळ बोठेच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. रेखा जरे यांची हत्या ३० नोव्हेंबर २०२० च्या रात्री अहमदनगर पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात झाली होती.

ADVERTISEMENT

काय होती घटना?

यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळच्या जातेगावच्या घाटात अडवून त्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. ३० नोव्हेंबरला नगर-पुणे रस्त्यावर ही घटना घडली होती. यावेळी कारमध्ये बसलेल्या रूणाल याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं. त्याच्याच मदतीने पोलिसांनी ५ जणांना अटक केली. मात्र या आरोपींची जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचं समोर आलं आहे. बाळ बोठेंनी सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणलं.

हे वाचलं का?

अहमदनगरपासून अवघ्या १७ किमी अंतरावर असलेल्या वाळकी या ठिकाणी बाळ बोठे लहानाचा मोठा झाला. कॉलेज शिक्षणानंतर त्याला फोटोग्राफी आवडू लागली तो फोटोग्राफीही करू लागला. त्याचे काही फोटो पेपरमध्येही छापून आले. त्यानंतर अहमदनगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव मिरीकर यांच्याशी त्याची ओळख झाली बाळ बोठेमधली धडपडी वृत्ती पाहून मिरीकरांनी त्याला पत्रकारितेत आणलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT