नाशिक : पोलीस चौकीत रंगली ओली पार्टी, मद्यधुंद पोलिसांची नागरिकाला धक्काबुक्की
नाशिक शहर पोलिसांच्या गंगापूर रोडवरील एका पोलीस चौकीत काही कर्मचारी ओली पार्टी करत असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांचा हा प्रकार पाहिल्यानंतर याचा व्हिडीओ तयार करुन त्यांना रंगेहाथ पकडलं. यावेळी मद्यधुंद पोलिसांनी व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला धक्काबुक्की केल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अकरा वाजल्याच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात डी.के.नगर भागातील […]
ADVERTISEMENT
नाशिक शहर पोलिसांच्या गंगापूर रोडवरील एका पोलीस चौकीत काही कर्मचारी ओली पार्टी करत असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांचा हा प्रकार पाहिल्यानंतर याचा व्हिडीओ तयार करुन त्यांना रंगेहाथ पकडलं. यावेळी मद्यधुंद पोलिसांनी व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला धक्काबुक्की केल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अकरा वाजल्याच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात डी.के.नगर भागातील नागरिकांना काही टवाळखोर त्रास देत होते. त्यामुळे या घटनेविरुद्ध पोलीस चौकीत तक्रार दाखल करायला गेलेल्या नागरिकांनी चौकीत चार कर्मचारी दारु पित बसलेले दिसले. या युवकाने दारु पित असल्याबद्दल पोलिसांना जाब विचारल्यामुळे रागावलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला चौकीत बंद करुन दिवे घालवत मारहाण केली. हा प्रकार सुरु असताना बाहेर लोकांची गर्दी जमल्यामुळे तणाव वाढला.
बाहेर गर्दी जमल्यानंतर चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी तिकडून पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतू काही नागरिकांनी पाठलाग करुन त्यांना पुन्हा चौकीत आणलं. काही नागरिकांनी नाशिक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. काहीवेळाने पोलीस उपायुक्त दिपाली खन्ना घटनास्थळी दाखल झाल्या असत्या त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेत मद्यमान करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. दरम्यान नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी या चारही मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यांनं निलंबन करुन विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत हे कर्मचारी दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे असं नाशिक पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
हे वाचलं का?
या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जमावाने गर्दी केली. अखेरीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर हा जमाव शांत झाला आहे. पोलीस उपायुक्त दिपाली खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी चारही कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जाईल. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. परंतू नाशकात पोलिसांच्या या ओल्या पार्टीची चर्चा चांगलीच रंगताना दिसली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT