राहुल गांधींच्या दिल्लीतील घरी पोहोचले पोलीस; काय आहे प्रकरण?
Rahul gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस (Delhi Police) रविवारी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी आणि डीसीपी सध्या राहुल गांधी यांच्या घरात उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. तासाभरानंतरही राहुल पोलिसांना भेटले नाही, अशी देखील माहिती मिळतेय. (Police reach Rahul Gandhi’s house in Delhi; ) त्याचवेळी […]
ADVERTISEMENT

Rahul gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस (Delhi Police) रविवारी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी आणि डीसीपी सध्या राहुल गांधी यांच्या घरात उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. तासाभरानंतरही राहुल पोलिसांना भेटले नाही, अशी देखील माहिती मिळतेय. (Police reach Rahul Gandhi’s house in Delhi; )
त्याचवेळी राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी पवन खेडा त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मात्र पोलिसांनी आधी त्यांना आत जाण्यापासून रोखले. मात्र, नंतर परवानगी देण्यात आली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. पवन खेडा म्हणाले की, राहुल गांधींना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारला काय वाटलं ते घाबरतील?, असं खेडा म्हणाले.
राहुल गांधी वीर सावरकरांबाबत योग्यच बोलले, तुषार गांधींचा पाठिंबा
खरे तर श्रीनगरमधील भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी आजही महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचे विधान केले होते. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना 16 मार्च रोजी नोटीस पाठवून विचारणा केली होती की, हे बोलणाऱ्या महिला कोणत्या आहेत. राहुल गांधींनी त्याची माहिती दिल्ली पोलिसांना द्यावी. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्याने अद्याप दिल्ली पोलिसांना उत्तर दिलेले नाही.