शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा मतदारांची NOTA ला पसंती, गोव्यात आघाडीची खिचडी शिजलीच नाही
गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर सुरु असताना महाराष्ट्रातील दोन पक्षांची निराशाजनक कामगिरी झाली आहे. गोव्यात शिवसेना 12 जागांवर निवडणूक लढवत होती. परंतू मतदारांनी शिवसेनेला पूर्णपणे नाकारलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा गोव्यात आघाडी करत निवडणुक लढवली होती. परंतू या आघाडीचं गणित यंदा गोव्यात काहीकेल्या […]
ADVERTISEMENT
गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर सुरु असताना महाराष्ट्रातील दोन पक्षांची निराशाजनक कामगिरी झाली आहे. गोव्यात शिवसेना 12 जागांवर निवडणूक लढवत होती. परंतू मतदारांनी शिवसेनेला पूर्णपणे नाकारलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा गोव्यात आघाडी करत निवडणुक लढवली होती. परंतू या आघाडीचं गणित यंदा गोव्यात काहीकेल्या जुळून येताना दिसलं नाही.
ADVERTISEMENT
निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार गोव्यात शिवसेनेला 0.18 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1.11 टक्के मत मिळाली आहेत. या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांपेक्षा गोव्यात लोकांनी NOTA ला जास्त मत दिली आहेत. गोव्यात NOTA ला मिळालेली मत 1.12 टक्के इतकी आहेत. भाजपला गोव्यात सर्वाधिक मतवाटा मिळाला असून त्यापाठोपाठ काँग्रेस, मगोप, आप, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष यांचा क्रमांक आहे.
गोव्यात कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली? जाणून घ्या…
हे वाचलं का?
-
आद आदमी पक्ष – 6.87 टक्के
तृणमुल काँग्रेस – 5.24 टक्के
ADVERTISEMENT
भाजप – 33.41 टक्के
ADVERTISEMENT
गोवा फॉरवर्ड – 1.83 टक्के
काँग्रेस – 23 टक्के
मगो पक्ष – 7.91 टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस – 1.11 टक्के
NOTA – 1.12 टक्के
शिवसेना – 0.18 टक्के
अपक्ष – 19.33 टक्के
मी भाजपला हरवलं… विजयानंतर बाबूश मोन्सेरात यांची अत्यंत धक्कादायक प्रतिक्रिया, गोव्यात काय घडणार?
गोव्यात यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अन्य नेत्यांनी तळ ठोकला होता. अनेक मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी सभाही घेतल्या होत्या. परंतू मतदारांना शिवसेनेने प्रतिसाद दिलेला दिसत नाहीये. सकाळी मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी पक्षाच्या कामगिरीबद्दल सावध प्रतिक्रीया दिली.
“गोवा असो किंवा मणिपूर असो आम्ही तिकडे मेहनत घेतली होती. आमचे खासदार तिकडे जाऊन बसले होते. आदित्य ठाकरेंनीही तिकडे सभा घेतली. कोणताही पक्ष आपल्या राज्याबाहेर जातो तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागतो. आम्ही तो केला आणि करत राहू. आम्ही थांबणार नाही.”
उत्तर प्रदेशात अखिलेश भाजपला टक्कर देतील, संजय राऊतांना विश्वास कायम
मागच्या निवडणुकीत गोव्यात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले असतानाही भाजपने आमदारांना विकत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली होती. मात्र यंदा यंदा असं काहीही होणार नाही असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. मी कालच पी.चिदंबरम यांच्याशी बोललो आहे. आमची सविस्तर चर्चा झाली आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. महाराष्ट्रातून त्यांना जी काही मदत लागेल ती मिळेल असंही राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT