पुणे: महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर
पुणे: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्याच्या नावाने फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ अपलोड करुन महिला कर्मचाऱ्याची बदनामी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे पोलीस विभागात मात्री एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अनेक सामान्य नागरिक विशेषत: महिला अशा प्रकाराला बळी पडल्याचं आपण ऐकलं […]
ADVERTISEMENT

पुणे: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्याच्या नावाने फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ अपलोड करुन महिला कर्मचाऱ्याची बदनामी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे पोलीस विभागात मात्री एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अनेक सामान्य नागरिक विशेषत: महिला अशा प्रकाराला बळी पडल्याचं आपण ऐकलं आहे. मात्र, आता थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीच असा प्रकार घडत असल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
दरम्यान, आता याप्रकरणी महिला कर्मचाऱ्याची बदनामी करणाऱ्या आरोपी विरोधात पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या क्राईम निरीक्षक अनिता हिवरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 26 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याराने याप्रकरणी तक्रार नोंदवली आह. तक्रारीनुसार तक्रारदार महिलेच्या नावाने दोन बनावट अकाउंट सोशल मीडियावर तयार करण्यात आले होते.
याच सोशल मीडिया अकाउंटमध्ये असं म्हटलं होतं की, ‘पोलीस मी माझ्या नवर्याला सोडून दिले आहे’. अटीट्यूड गर्ल, माय लाईफ, माय चॉईस, माय मिस्टेक, बिलिव्ह इन माय सेल्फ’ असे लिहून फिर्यादी महिला कर्मचाऱ्याच्या अकाउंटवर मजकूर पोस्ट करण्यात आला. तसेच तो मजकूर देखील व्हायरल करण्यात आला. याशिवाय त्यावर अश्लील व्हीडिओ देखील पोस्ट करण्यात आला होता.










