Pune Crime : लष्करात असल्याचे सांगून पुण्यातील तरुणीवर बलात्कार; तरुणाला नगरमध्ये बेड्या
पुणे: एका मॅट्रिमोनी वेबसाईटवर ओळख झालेल्या तरुणाने एका तरुणीचे लैंगिक शोषण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना पुण्यासारख्या शहरात घडली आहे. ‘मी सैन्य दलात असून आपण लवकरच लग्न करु,’ असं आरोपी तरुणाने तरुणीला सांगितलं आणि विश्वास संपादन केला. तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर तरुणाने तिचे लैंगिक शोषण करणं सुरु केलं. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला अहमदनगर येथून जेरबंद करण्यात […]
ADVERTISEMENT

पुणे: एका मॅट्रिमोनी वेबसाईटवर ओळख झालेल्या तरुणाने एका तरुणीचे लैंगिक शोषण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना पुण्यासारख्या शहरात घडली आहे.
‘मी सैन्य दलात असून आपण लवकरच लग्न करु,’ असं आरोपी तरुणाने तरुणीला सांगितलं आणि विश्वास संपादन केला. तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर तरुणाने तिचे लैंगिक शोषण करणं सुरु केलं.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला अहमदनगर येथून जेरबंद करण्यात सिंहगड पोलिसांना यश आले आहे. तर मुंबई, लातूर या ठिकाणी देखील काही महिलांची आरोपीने फसवणूक केल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रशांत भाऊराव पाटील (वय 31) बेळगाव असे आरोपी तरुणाचे नाव असल्याचं समजतं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मॅट्रिमोनी साईटवर एका तरुणीची एका तरुणाशी ओळख झाली. तेव्हा त्याने मी सैन्यात असून तिला वर्दीतील फोटो देखील दाखविले. पुढे त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपी प्रशांत हा पीडित तरुणीला भेटण्यासाठी पुण्यात सैन्याच्या वर्दीत आला.’