Mini Lockdown : राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केल्या आठ महत्त्वाच्या सूचना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. झूम मिटिंगवरून या दोघांची चर्चा झाली. राज ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लॉकडाऊन पुन्हा लावण्यात आल्याने लोक संभ्रमात आणि गोंधळात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही तक्रारी राज ठाकरेंकडे आल्या होत्या आणि काही सूचनाही आल्या होत्या. त्यातल्या सूचना राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना वाचून दाखवल्या.

राज ठाकरेंनी नेमक्या काय सूचना केल्या?

पहिला विषय होता उत्पादनाबाबत. जे लघू उद्योग आहेत, छोटे व्यापारी, छोटे कारखानदार यांना उत्पादन करायला सांगितलं आहे पण विक्री करायला सांगितलेलं नाही. जर उत्पादन करून विक्री होणार नसेल तर ते कशाला उत्पादन करतील? केलेलं उत्पादन त्यांनी ठेवायचं कुठे? त्यामुळे ही उत्पादनं जिथे विकली जातात ती दुकानं दोन-तीन दिवस उघडी ठेवली पाहिजेत. छोट्या व्यापाऱ्यांना दोन ते तीन दिवस दुकानं उघडी ठेवण्यासाठी मुभा द्यावी.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसरी सूचना

बँका सध्या जबरदस्ती करत आहेत. या सगळ्या व्यवसाय बंद आहेत, अनेक लोकांनी अनेक गोष्टी घेतल्या आहेत. बँकाचे हप्ते लोकांवर आहेत. बँकांचे पैसे त्यांना परत मिळाले पाहिजेत हे योग्यच आहे. मात्र लोकांकडे पैसे असतील तर ते बँकांकडे जातील ही बाब विचारात घेतली पाहिजे. सगळ्या बँकांशी राज्य सरकारने बोलावं आणि सक्तीने जे वसुली करण्यात येतं आहे. ते बंद केलं गेलं पाहिजे लोकांना काही दिवसांची सवलत देणं आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

वीज बिलांबाबत तिसरी सूचना

ADVERTISEMENT

वीज बिलं लॉकाडाऊन काळात माफ करणं, व्यावसायिकांना ५० टक्के सवलत द्यावी. लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. अर्थव्यवस्था कोसळली आहे. समाजमनही कोसळलं आहे. त्याचा विचार सरकारने करावा.

चौथी सूचना

गेल्या लॉकडाऊनच्या वेळी अनेक कंत्राटी कामगरांना राज्य सरकारने नियुक्त केलं होतं. नंतर त्यांना काढून टाकण्यात आलं. आता त्यांना परत बोलवा आणि कायमस्वरूपी काम द्या. महापालिका, नगरपालिका यांची जी कामं निघतात तिथे त्यांच्या नियुक्त्या करा. दरवेळी तहान लागल्यावरच विहिर खणण्यात अर्थ नाही.

रजनीकांतना काहीच अशक्य नाही…: राज ठाकरे

पाचवी सूचना

सलून, जिम हे उघडी ठेवण्यास आठवड्यातून किमान तीन दिवसांची संमती द्यावी.

सहावी सूचना

सराव करणाऱ्या सगळ्या खेळाडूंसाठी काही सवलत असणं गरजेचं आवश्यक आहे. गर्दी होणार नाही पण या खेळाडूंना सराव करता येईल अशी व्यवस्था करावी

सातवी सूचना

शेतकऱ्यांना काही प्रमाणात हमी भाव द्यावा.. त्यामुळे कोसळलेला शेतकरी काही प्रमाणात सावरण्यास मदत होईल

आठवी सूचना

शाळा बंद आहेत, पण जी फी आकारण्यात येते आहे ती तेवढीच आहे. या शाळांना जर सांगितलं गेलं नाही की फी अर्धी करा किंवा घेऊ नका.. तर ते पूर्ण फी आकारात राहतील. त्याचा विचार राज्य सरकारने करावा. दहावी आणि बारावीच्या मुलांनाही पास करावं. जसा फीच्याबाबतीत विद्यार्थ्यांचा विचार केला गेला पाहिजे तसाच शाळांचाही विचार केला पाहिजे.

या सगळ्या सूचनांबद्दल मुख्यमंत्री सकारात्मक होते असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी या सगळ्या सूचना सांगितल्या. या सगळ्या सूचनांवर मुख्यमंत्री विचार करून योग्य तो निर्णय घेतील अशीही आशा राज ठाकरेंनी बोलून दाखवली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT