‘शिवरायांचं नाव घेतलं की, मुस्लिम मतं…’, राज ठाकरेंची कोणावर जहरी टीका?
Raj Thackeray: कुडाळ: ‘शिवरायांचं (Shivaji Maharaj) नाव घेतलं की, मुस्लिम मतं (Muslim Votes) जातात. मग कोणत्या तरी टोळ्या उभ्या करायच्या फंडिंग द्यायला आणि त्यांच्याकडून शिवरायांचं राजकारण करायचं. म्हणजे हे इतर समाज आणि मराठा समाज यांच्यात जशी फूट पाडता येईल तेवढा फक्त प्रयत्न करायचा. तेव्हापासून हे सगळं सुरु झालं. महाराष्ट्रात (Maharashtra) हे विष कालवलं गेलं ते […]
ADVERTISEMENT
Raj Thackeray: कुडाळ: ‘शिवरायांचं (Shivaji Maharaj) नाव घेतलं की, मुस्लिम मतं (Muslim Votes) जातात. मग कोणत्या तरी टोळ्या उभ्या करायच्या फंडिंग द्यायला आणि त्यांच्याकडून शिवरायांचं राजकारण करायचं. म्हणजे हे इतर समाज आणि मराठा समाज यांच्यात जशी फूट पाडता येईल तेवढा फक्त प्रयत्न करायचा. तेव्हापासून हे सगळं सुरु झालं. महाराष्ट्रात (Maharashtra) हे विष कालवलं गेलं ते 1999 पासून.’ अशी जहरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर (Sharad Pawar) केली आहे. (raj thackerays venomous criticism of ncp on taking name of shivaji maharaj muslim votes are not getting)
ADVERTISEMENT
सध्या राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यात एका पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काही वादग्रस्त विधानं केली जात आहेत. तर काही जणांकडून शिवाजी महाराजांसोबतच इतरांचा तुलना केली जातेय. या सगळ्यावर बोलताना राज ठाकरेंनी आपल्या शैलीत या सर्वांचा समाचार घेतला. मात्र, त्यांनी या सगळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले:
‘मी जयसिंगराव पवारांशी काल चर्चा केली. यावेळी अर्थातच इतिहासबाबतही चर्चा झाली. बोलता-बोलता काही विषय निघाले. जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. हे जे सध्या इतिहासाकडे जातीतून पाहण्याचं जे पेव फुटलंय काही ठराविक लोकांचं आहे ते. तोही त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. त्यातून ही गोष्ट बोलणं आवश्यक आहे.’
हे वाचलं का?
‘काल मी त्यांना जेव्हा विचारलं की, तो एक चित्रपट आहे वेडात मराठी वीर दौडले सात.. तर त्या दिग्दर्शकाने काही नावं त्यांची सहा जणांची नावं टाकली. मग अजून कोणी तरी बोललं की, ही सहा नावं नाही तर ही सहा नावं आहेत. बघा हा आता गंमत..’
‘
ADVERTISEMENT
वेडात मराठे वीर दौडले सात नव्हतेच…’
‘मग मध्यंतरी मी गजानन मेहेंदळे यांना भेटलो. मी त्यांना विचारलं की वेडात मराठी वीर दौडले सात.. काही जणं ही नावं सांगतायेत.. तर काही जण दुसरी नावं सांगतायेत. तुमचं काय म्हणणं आहे. मी काल जयसिंग पवार यांच्याशीही बोललो.. ते मला म्हणाले की, गजाननराव बरोबर बोलतायेत.’
ADVERTISEMENT
‘कारण गजाननराव हे इतिहासाचे जे दाखले आहेत त्याचे अभ्यासक आहेत. तर मी त्यांना जेव्हा विचारलं तर म्हणाले की, जगातील कोणत्याही इतिहासाच्या पानात ते सात होते की, आठ होते की… दहा होते असं कुठेही लिहलेलं नाही. कोणत्याही पत्रात प्रतापराव गुजरांसोबत कोणकोण लोकं होती याचा काहीही दाखला नाही. आतपर्यंत आपण जी नावं ऐकली ती काल्पनिक नावं आहेत.’
‘जसं आपल्याकडे पूर्वी जे पोवाडे उभे केले जायचे.. एक वातावरण उभे केले जातात असंख्य.. कसंय इतिहास नुसता सांगायला गेला तर तो रुक्ष आहे भयंकर.. सगळ्याचेच संदर्भ आणि दाखले तुम्हाला काही मिळत नसतात. ते त्यांचा तर्क मांडतात.’
‘आपल्याकडचा इतिहास कोणी मराठ्यांनी किंवा ब्राम्हणांनी लिहलेला नाही’
‘तर्काच्या आधारावर इतिहासाला धक्का न लावता इतिहासकार हे इतिहास उभा करत असतात. आपल्याकडचा इतिहास हा कोणी मराठ्यांनी किंवा ब्राम्हणांनी लिहलेला नाही. मूळ दाखले हा…’
‘त्यामुळे हे पोर्तुगिजांकडून इतर मोघलांकडून, ब्रिटिशांकडून आलेल्या गोष्टी आहेत. महाराजांच्या काळातील एक ग्रंथ म्हणजे शिवभारत. या व्यतिरिक्त फार काही दाखले नाहीत.’
‘शिवरायांना धक्का लावणारा मायेचा पूत अजून जन्माला यायाचाय’
‘यातून काही तरी शोधून आपल्याला लोकांपर्यंत इतिहास पोहचवावा लागतो. त्यामुळे ही नावं होती का ती नावं होती याला काही अर्थच उरला नाही. जे कोणी सिनेमा बनवतात त्यांना सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय सिनेमा बनवताच येत नाही. फक्त त्याला कुठे धक्का लागणार नाही एवढं आपण बघणं गरजेचं आहे. आणि अशाप्रकारे शिवरायांना धक्का लावणारा मायेचा पूत अजून जन्माला यायाचाय.’
पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर टीका
‘हे खरं राष्ट्रवादी काँग्रेसपासून सगळं सुरु झालं. बरं का.. जे शरद पवार कधीही सुरुवातीपासून शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे नाहीत.. काढून बघा त्यांची भाषणं. व्यासपीठावर शाहू-फुले-आंबेडकर. मी त्यांची मुलाखत घेतलेली तेव्हा पण विचारलेलं. त्यात त्यांनी असं म्हटलेलं की, शाहू-फुले-आंबेडकर हा एक विचार आहे. मग शिवाजी महाराज काय विचार नव्हता?’
‘शिवरायांचं नाव घेतलं की, मुस्लिम मतं जातात. मग कोणत्या तरी टोळ्या उभ्या करायच्या फंडिंग द्यायला, मग त्यांच्याकडून शिवरायांचं राजकारण करायचं. म्हणजे हे इतर समाज आणि मराठा समाज यांच्यात जशी फूट पाडता येईल तेवढा फक्त प्रयत्न करायचा. तेव्हापासून हे सगळं सुरु झालं. महाराष्ट्रात हे विष कालवलं गेलं ते 1999 पासून.’
‘काही संबंध होता का? राहुल गांधींना सावरकरांचा विषय काढण्याचा काही संबंध होता का… हे मुद्दाम काढले जातात आणि त्यातून मूळ विषय बाजूला राहतात.’ असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरच निशाणा साधला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT