भर सभेत ‘मुंबई Tak’ची मुलाखत दाखवत राज ठाकरेंची पवारांवर तुफान टीका
औरंगाबाद: औरंगाबादमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुंबई Tak ने घेतलेली जेम्स लेनची मुलाखत दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. पाहा राज ठाकरेंनी मुंबई Tak ने घेतलेली मुलाखत दाखवत शरद पवारांवर काय टीका केली: ‘आता जेम्स लेन… इतकी वर्ष ही माणसं सत्तेत होती.. खेचून आणायचा होता त्या […]
ADVERTISEMENT

औरंगाबाद: औरंगाबादमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुंबई Tak ने घेतलेली जेम्स लेनची मुलाखत दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
पाहा राज ठाकरेंनी मुंबई Tak ने घेतलेली मुलाखत दाखवत शरद पवारांवर काय टीका केली:
‘आता जेम्स लेन… इतकी वर्ष ही माणसं सत्तेत होती.. खेचून आणायचा होता त्या जेम्स लेनला. विचारायचं होतं तुला कोणी सांगितलं हे. त्या जेम्स लेनची आता ‘इंडिया टुडे’ने मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमधील फक्त चार प्रश्न मी तुम्हाला दाखवायला आणले आहे.. ते चार प्रश्न फक्त आपण बघून घ्या.’
जेम्स लेनच्या मुलाखतीतील हा काही भाग आहे हा.