बंटी पाटील मुन्ना महाडिकांना विजयाचा गुलाल उधळू देणार?, दोघांमधील संघर्ष कधी उफाळून आला?

मुंबई तक

कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की लगेच तोंडी येतात, ती म्हणजे सतेज (बंटी) पाटील आणि धनंजय (मुन्ना) महाडिक! कोल्हापुरात कुठलीही निवडणूक लागली की, राजकारण दोघांभोवती फेर धरायला लागतं. आताच या दोघांविषयी बोलण्याच कारण म्हणजे भाजपने धनंजय महाडिकांना राज्यसभेसाठी दिलेली उमेदवारी. आणि यालाच धरून उपस्थित होत असलेला एक प्रश्न की, बंटी पाटील यंदातरी धनंजय महाडिकांना विजयाचा गुलाल उधळू […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की लगेच तोंडी येतात, ती म्हणजे सतेज (बंटी) पाटील आणि धनंजय (मुन्ना) महाडिक! कोल्हापुरात कुठलीही निवडणूक लागली की, राजकारण दोघांभोवती फेर धरायला लागतं. आताच या दोघांविषयी बोलण्याच कारण म्हणजे भाजपने धनंजय महाडिकांना राज्यसभेसाठी दिलेली उमेदवारी. आणि यालाच धरून उपस्थित होत असलेला एक प्रश्न की, बंटी पाटील यंदातरी धनंजय महाडिकांना विजयाचा गुलाल उधळू देणार का?

तसं पाहिलं तर सतेज आणि धनंजय हे महादेवराव महाडिक यांच्या तालमीतले पैलवान. दोघांची मैत्रीही नावजलेली होती. पण नंतरचं करिअर हे एकमेकांच्या विरोधात गेलं. सुरुवात धनंजय महाडिकांनी केली. धनंजय महाडिक लोकसभेच्या मैदानात उतरले. 2004 सालीच शिवसेनेकडून लोकसभा लढवली. मात्र राष्ट्रवादीतल्या सदाशिवराव मंडलिकांनी 12 हजारांच्या फरकाने महाडिकांचा पराभव केला.

धनंजय महाडिकांनी जोरदार प्रवेश केल्यानंतर सतेज पाटील मैदानात राजकीय मैदानात उतरले. 2004 साली करवीर विधानसभा मतदार संघातून सतेज पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यावेळेचे आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकरांचा पराभव केला. विधानसभेत पाऊल ठेवलेल्या सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्या राजकारणाची सुरूवात झाली ती अशी!

आता हे झाल्यावर परत 2009 च्या निवडणुका आल्या. 2004 मध्ये अपक्ष लढलेले सतेज पाटील यावेळी काँग्रेससोबत होते, तर 2004 मध्ये शिवसेनेकडून लढलेले धनंजय महाडिक 2009 च्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीकडे गेले.

हे वाचलं का?

    follow whatsapp