राज्यसभेसाठी आज मतदान, सहाव्या जागेसाठी मोठी चुरस; वाचा काय आहेत नियम?
संपूर्ण राज्याचं तसंच देशाचं लक्ष लागलेली राज्यसभा निवडणूक आज पार पडते आहे. राज्यात निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये भाजपचे दोन, शिवसेना एक, राष्ट्रवादी एक आणि काँग्रेस एक असे उमेदवार निवडून येतील हे निश्चित आहे. मात्र सहाव्या जागेसाठी चुरस रंगणार आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेसाठी उमेदवार दिला […]
ADVERTISEMENT

संपूर्ण राज्याचं तसंच देशाचं लक्ष लागलेली राज्यसभा निवडणूक आज पार पडते आहे. राज्यात निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये भाजपचे दोन, शिवसेना एक, राष्ट्रवादी एक आणि काँग्रेस एक असे उमेदवार निवडून येतील हे निश्चित आहे. मात्र सहाव्या जागेसाठी चुरस रंगणार आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेसाठी उमेदवार दिला आहे.
आज पार पडत असलेल्या या मतदानासाठी क्रॉस व्होटिंग किंवा मतं फुटू शकतात ही भीती सगळ्याच पक्षांना आहे. त्यामुळे शिवसेनेने (Shiv Sena) पक्षातल्या आमदारांना व्हीप जारी केला आहे. प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसतो आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसंच भाजपने आपल्या आमदारांना मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलं आहे.
आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान होणार आहे. तर संध्याकाळी पाच वाजल्यापासून मत मोजणी सुरू होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. मात्र एका आमदाराचं निधन झालंय. तर अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक यांना कोर्टाने मतदानाचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे २८५ मतदार सहा जागांसाठी मतदान करतील.
राज्यसभा निवडणूक : ‘ट्रायडंट’मधील बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना काय म्हणाले?