शिवसेनेला मोठा धक्का, निवडणूक आयोगाकडून सुहास कांदेंचं मत रद्द, मतमोजणी सुरु करण्याचे आदेश

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावर भाजप आणि महाविकास आघाडीने घेतलेल्या आरोपावर गेल्या अनेक तासापासून निवडणूक आयोगाची बैठक सुरु होती. आता मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक नुकतीच संपली असून याबाबत निर्णय जाहीर केला आहे. यावेळी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत रद्द ठरवलं आहे. हे एक मत वगळून उर्वरित 284 मतांची मोजणी करण्याचे आदेश आयोगाने दिलं आहे.

याचा अर्थ भाजपकडून जे तीन आक्षेप घेण्यात आले होते त्यापैकी दोन आक्षेप आयोगाने फेटाळले आहेत. तर महाविकास आघाडीने सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांच्याबाबत जे आक्षेप घेतले होते ते आक्षेप देखील आयोगाने फेटाळले आहेत. त्यामुळे आता 284 मतांमधून राज्यसभेसाठीचे उमेदवार निवडले जाणार आहेत.

LIVE UPDATE:

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 • आमचे चारही उमेदवार निवडून येतील – जयंत पाटील

 • अशा पद्धतीने सगळी लढाई दिल्लीला घेऊन जाणं आणि सोयीचा अशा निर्णयाची अपेक्षा करणं हा सगळा प्रकार ते गेले काही काळ मी बघतोय. – जयंत पाटील

 • ADVERTISEMENT

 • आज कांदे यांचं मत त्यांनी बाजूला ठेवलं आहे. मला वाटतं कांदे योग्य ती कायदेशीर लढाई लढतील – जयंत पाटील

 • ADVERTISEMENT

 • सुहास कांदे यांचं मत रद्द करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय

 • शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत रद्द करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय

 • त्यामुळे आता या सगळ्याबाबत नेमका काय निकाल दिला जाणार याची ऑर्डर तयार केली जात आहे. त्यामुळे पुढील काही वेळातच निवडणूक आयोग आपला निकाल सुनावेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

  निवडणूक आयोग या मुद्द्यांवर करतंय विचार:

  1. मतमोजणी सुरु करुन आदेश येईपर्यंत निकाल देऊ नये.

  2. आक्षेप घेतलेली मतं वगळून मतमोजणी करायची

  3. हनुमान चालीसा वादावर योग्य ती पावलं उचलण्यात यावीत

  4. आयोगाचा आजचा निर्णय उद्यासाठी दाखला असेल

  भाजप आणि महाविकास आघाडीकडून ज्या काही तक्रारी निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या तक्रारीवर निवडणूक आयोगने अगदी मॅरेथॉन चर्चा केली आहे. त्यामुळे या तक्रारीवर आता निर्णय आपल्या समोर येणार आहे.

  राज्यसभा निवडणुकीच्या मतदानातील नेमका वाद काय आहे?

  भाजपचा आक्षेप काय?

  भाजप नेते प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं बाद का ठरविण्यात याविषयी भाजपचा काय नेमका दावा आहे स्पष्ट केलं होतं.

  प्रसाद लाड म्हणाले की, ‘भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्या निवडणुकीचे एजंट हे पराग अळवणी यांनी यशोमती ठाकूर यांनी मत टाकताना मतपत्रिका जी त्यांच्या इलेक्शन एजंटला दाखवायची असते ती मतपत्रिका त्यांनी इलेक्शन एजंटच्या हातात दिलं.’

  ‘त्याचप्रमाणे सुहास कांदे यांनी अशा अंतरावरुन मत दाखवलं की, जेणेकरुन दोन ठिकाणच्या म्हणजेच दोन पक्षाच्या एजंटला ते मत दिसेल. त्याच प्रमाणे अतुल सावे हे आमच्या अनिल बोंडेंचे इलेक्शन एजंट आहेत. त्यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीने मत टाकताना प्रतोदाच्या हातात मतपत्रिका दिली ते सुद्धा आक्षेपार्ह होतं.’ असा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे.

  ‘याबाबत लेखी तक्रार करुन ही तीन मतं बाद करावी अशी मागणी आमच्या दोन्ही पोलिंग एजंटने केली आहे. मला वाटतं की, 100 टक्के असा प्रकार करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे ही मतं बाद करावीत ही विनंती पराग अळवणी यांनी केली आहे. मला खात्री आहे की, हे मत बाद होईल.’ असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला होता.

  महाविकास आघाडीची देखील निवडणूक आयोगाकडे तक्रार

  दुसरीकडे भाजपने महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर महाविकास आघाडीने देखील तात्काळ भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे त्यांचं मत बाद करण्याची तक्रार केली आहे. तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा विधानसभेत आणून देखील नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांचंही मत बाद करण्यात यावं अशी मागणी महाविकास आघाडीने देखील केली आहे.

  राज्यसभा निवडणूक: ‘महाराष्ट्राला मी खरं काय ते सांगणार’, जितेंद्र आव्हाड प्रचंड संतापले!

   follow whatsapp

   ADVERTISEMENT